मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता प्रसाद ओक सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. प्रसाद त्याच्या कामाबाबतची माहिती अनेकदा शेअर करताना दिसतो. पत्नी व कुटुंबियांबरोबरचे फोटोही प्रसाद शेअर करत असतो.

प्रसादने नुकतंच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो “काल एक सुंदर मुलगी मला भेटायला आली आणि म्हणाली, काय दिसता ओ तुम्ही”, असं म्हणताना दिसत आहे. त्यानंतर व्हिडीओत महिलेचा आवाजात “पुढे ती म्हणाली वयाच्या मानाने”, असं कोणीतरी म्हटलं आहे. प्रसादचा हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

हेही वाचा>>१४ वर्षांनंतर दिग्दर्शकाचा ‘तारक मेहता…’ मालिकेला रामराम; समोर आलं खरं कारण

हेही वाचा>> Video: चित्रा वाघ “थोबडवून काढेन” म्हणाल्यानंतर उर्फी जावेदने पुन्हा शेअर केला चित्र-विचित्र कपड्यांमधील व्हिडीओ, म्हणाली…

“वयाच्या मानाने वगैरे असं काही नसतंच. या सगळ्या अंधश्रद्धा असतात”, असं कॅप्शन देत प्रसादने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांबरोबरच सेलिब्रिटींनीही कमेंट केल्या आहेत. अभिनेत्री अमृता खानविलकरने “हाहाहा वयाच्या मानाने” अशी कमेंट करत हसण्याचे इमोजी पोस्ट केले आहेत. तर अभिनेता प्रथमेश परबने “ओके बाय” असं कमेंटमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा>>‘बेशरम रंग’मधील भगव्या बिकिनीवरुन मुकेश खन्ना यांचा सेन्सॉर बोर्डला सल्ला; ‘पीके’, ‘आदिपुरुष’चा उल्लेख करत म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रसाद ओकने आजवर अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. सध्या तो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात परिक्षकाच्या भूमिकेत आहे. ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटातील प्रसाद ओकची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.