छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. याच कार्यक्रमामुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून प्रियदर्शनी इंदलकरला ओळखले जाते. तिच्या अभिनयाच्या जोरावर तिने सर्वांचीच मनं जिंकली आहे. आता तिला तिच्या कामासाठी ‘ग्लोबल आयकॉन ऑफ इंडिया’ हा पुरस्कार मिळाला आहे.

प्रियदर्शनी इंदलकरने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. यात ती अभिनेते शरद पोंक्षे यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारताना दिसत आहे. याला कॅप्शन देताना ती भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : मुंबईच्या वाहतूक कोंडीला कंटाळली रिंकू राजगुरु, फोटो पोस्ट करत म्हणाली…

प्रियदर्शनी इंदलकरची पोस्ट

“मला ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया हा पुरस्कार मिळाला आणि तो देखील शरद पोंक्षे यांच्याकडून. किती सुंदर संध्याकाळ…

अशी प्रोत्साहनाची थाप पाठीवर पडल्यावर, काम करायची ऊर्जा आणखी वाढ़ते. धन्यवाद कशीश सोशल फाऊंडेशन! आणि तुम्ही जे काम करताय, त्या साठी अनेक शुभेच्छा!!”, असे कॅप्शन तिने या व्हिडीओला दिले आहे.

आणखी वाचा : मिलिंद गवळींनी चाखली सुप्रिया पाठारेंच्या लेकाच्या हॉटेलमधील पदार्थांची चव, म्हणाले “त्याने अतिशय…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रियदर्शनी इंदलकरला हा पुरस्कार मिळाल्यानंतर अनेक कलाकारांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान प्रियदर्शनी ही सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात झळकत आहे. त्याबरोबरच तिने ‘ती फुलराणी’ आणि ‘शांतीत क्रांती’ या दोन चित्रपटातही काम केले आहे.