‘लगोरी’, ‘नांदा सौख्यभरे’, ‘चाहूल’, ‘बंध रेशमाचे’ अशा अनेक टीव्ही मालिकांमधून स्वत:ची ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे रेश्मा शिंदे(Reshma Shinde) होय. रंग माझा वेगळा या मालिकेतून ही अभिनेत्री घराघरांत पोहोचली. सध्या रेश्मा ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत जानकी नावाचे पात्र साकारत आहे. तिच्या अभिनयासाठी तिचे वेळोवेळी कौतुक होताना दिसते. आता मात्र गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ती मोठ्या चर्चेत आहे. तिने शेअर केलेल्या सोशल मीडियावरील पोस्ट चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत.

काय म्हणाली अभिनेत्री?

अभिनेत्रीचे केळवण नुकतेच पार पडले. या कार्यक्रमाचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. त्याला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळताना दिसले. आता रेश्मा शिंदेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे; ज्यामध्ये तिने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. केळवणाचा एक व्हिडीओ तिने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्या मित्र- मैत्रिणीही दिसत आहेत. त्यात हर्षदा खानविलकर, अनघा भगरे, विदिशा म्हसकर, शाल्मली तोळे, आशुतोष गोखले, सुयश टिळक असे अनेक कलाकार आहेत. जे कार्यक्रमाची तयारी करत आहेत. अभिनेत्री लिहिते, “केळवणाच्या पानात जसे वेगवेगळे पदार्थ असतात, प्रत्येकाचा रंग वेगळा असतो, चव वेगळी असते, काही आंबट काही गोड, काही झणझणीत, तर काही चटपटीत. एखादा पदार्थ नसला, तर पान अपूर्ण राहतं. अगदी तसंच माझं नातं या सगळ्या माझ्या माणसांबरोबर आहे. माझ्या माणसांचा हात धरून नवीन आयुष्याची सुरुवात करतेय.”

इन्स्टाग्राम

कलाकारांच्या कमेंट्सने वेधले लक्ष

रेश्माच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांसह कलाकारांनीदेखील कमेंट केल्या आहेत. अभिनेता सुयश टिळकने लिहिलेय की, तुला कायम आनंद आणि प्रेम मिळत राहो, या शुभेच्छा! शर्वरी जोगने लिहिले, “किती गोड. अभिनंदन.” विदिशा म्हसकरने कमेंट करत लिहिले, “मी हा व्हिडीओ लूपवर बघत आहे. खूप खूप खूश राहा. आता कुठे जाणार जाऊन जाऊन, चिडायचंसुद्धा इथेच, रडायचंसुद्धा इथेच आणि खळखळून हसायचंसुद्धा इथेच.” अनघाने लिहिले, “अशीच या रीलसारखी आनंदित राहा. आमंच खूप प्रेम आहे तुझ्यावर. शेवटी दीपाला तिचा कार्तिक मिळाला आहे. मी अशीच आयुष्यभर श्वेतासारखी त्रास देत राहीन.” कलाकारांच्या या कमेंटला रेश्मानेदेखील रिप्लाय दिल्याचे पाहायला मिळत आहे.

कलाकारांबरोबरच चाहत्यांनी केलेल्या कमेंट्स लक्ष वेधून घेताना दिसत आहेत. अनेकांनी तिचे अभिनंदन केले आहे. तर, अनेकांनी नवरा कोण आहे, असा प्रश्न विचारला आहे. एका नेटकऱ्याने म्हटले, “नवरा मुलगा कोण आहे?”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटले, “कोणाशी ठरलं आहे लग्न?”, आणखी एक नेटकरी म्हणतो, “नवरदेव कोण आहे, सांगतच नाही” अशा नेटकऱ्यांच्या कमेंट्सवरून चाहत्यांना रेश्माचा होणारा जोडीदार कोण आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता लागली असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा: किती वर्षांची झाली ‘चंद्रा’? ‘ढेर सारा प्यार’ म्हणत पती हिमांशूने दिल्या अमृता खानविलकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आता रेश्मा तिच्या जोडीदाराबद्दल चाहत्यांना कधी सांगणार, तिचे लग्न केव्हा आहे, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. सध्या ती घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे.