नाटक, मालिका, चित्रपट आणि वेब सीरिज या चारही माध्यमात आपलं वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे स्पृहा जोशी. आपल्या सहजसुंदर अभिनयाने स्पृहाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. तिने अभिनया व्यतिरिक्त आपल्या उत्कृष्ट निवेदनाने आणि कवितांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अशा या हरहुन्नरी अभिनेत्रीचा अलीकडेच वाढदिवस झाला.

अभिनेत्री स्पृहा जोशीचा १३ ऑक्टोबरला वाढदिवस होता. तिने आता ३५व्या वयात पदार्पण केलं आहे. वाढदिवसानिमित्ताने स्पृहाच्या चाहत्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या. याचेच आभार व्यक्त करण्यासाठी तिने नुकतीच इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टममध्ये तिने रुग्णालयातील स्वतःच्या आई-वडिलांचा फोटो पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – राहा कपूर बाबा रणबीरला ‘या’ टोपण नावाने मारते हाक, आलिया भट्टने केला खुलासा

पहिल्या फोटोमध्ये स्पृहा स्वतः दिसत असून दुसऱ्या फोटोत स्पृहाचे आई-वडील पाहायला मिळत आहे. हे दोन फोटो शेअर करत स्पृहाने लिहिलं आहे, “१३ ऑक्टोबरला झालेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अजून येतायत…आई बाबांची तब्येत सुधारतेय.. @jupiterhospital Baner Pune…त्यांची आणि पेशंटच्या नातेवाईकांची प्रेमाने काळजी घेतायत…सगळे स्नेही, आप्तेष्ट, मित्र ‘काहीही लागलं तरी सांग’ म्हणून दिलासा देतायत.. इतकी माणसं जोडलेली असणं ही त्या दोघांची पुण्याई.”

“आपल्यावर प्रेम करणारी इतकी माणसं आहेत, ही भावना फार मन भरून टाकणारी आहे. मी तुम्हा सगळ्यांची ऋणी आहे. प्रत्येकाला उत्तर देणं जमलं नाही…रागावू नका…लोभ आहेच, तो वाढत राहो,” असं स्पृहा जोशीने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

हेही वाचा – अभिनेता शशांक केतकरच्या लाडक्या लेकाला पाहिलंत का? सेल्फी होतोय व्हायरल

स्पृहाच्या पोस्टवर अनेक चाहत्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. “काळजी घे”, “सगळं काही ठीक होईल…यासाठी प्रार्थना”, “ते लवकर बरे होऊन घरी येतील”, “आई-बाबांना काय झालं?”, अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा – Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्ते अचानक ‘बिग बॉस १८’च्या घराबाहेर? नेमकं काय घडलं, जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्पृहा जोशीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, सप्टेंबर महिन्यात तिची ‘सुख कळले’ मालिका ऑफ एअर झाली. अवघ्या पाच महिन्यांनंतर स्पृहाची ही मालिका बंद करण्यात आली. असं असलं तरी दुसऱ्या बाजूला स्पृहाचा ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ हा कार्यक्रम रंगभूमीवर जोरदार सुरू आहे.