मराठी अभिनयविश्वात लगीनघाई सुरू आहे. अनेक कलाकारांनी २०२४ मध्ये आयुष्यात जोडीदार निवडून नवीन इनिंगला सुरुवात केली. मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंत, अभिनेत्री स्नेहा चव्हाण, मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री रेश्मा शिंदे, किरण गायकवाड-वैष्णवी कल्याणकर, निखिल राजेशिर्के, शाल्व किंजवडेकर यांसह अनेक मराठी कलाकार २०२४ मध्ये लग्नबंधनात अडकले. आता मराठी टीव्ही मालिकांमध्ये काम करणाऱ्या एका अभिनेत्रीने २०२४ वर्षाच्या शेवटच्या दिवशी लग्नगाठ बांधली आहे. तिने लग्नाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करून आनंदाची बातमी दिली.

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील अभिनेत्री तेजस्विनी सुनील (Tejaswini Sunil Wedding) लग्नबंधनात अडकली आहे. तेजस्विनीने श्रीराम निजामपूरकरशी मंगळवारी (३१ डिसेंबर रोजी) पारंपरिक पद्धतीने लग्नगाठ बांधली. तिचा लग्नसोहळा पेशवाई थाटात पार पडला. तिच्या लग्नाच्या फोटोंची सध्या खूपच चर्चा आहे.

हेही वाचा – ‘तारक मेहता..’ फेम ‘सोनू भिडे’ अडकली लग्नबंधनात, बाबाची भूमिका करणारा मंदार चांदवडकर माफी मागत म्हणाला…

तेजस्विनीने तिच्या लग्नात हिरव्या रंगाची लाल काठ असलेली पारंपरिक नऊवारी नेसली होती. पारंपरिक दागिन्यांनी तिने तिचा लूक पूर्ण केला होता. तर नवरदेव श्रीराम निजामपूरकरही हिरव्या व पांढऱ्या रंगाचा पेशवाई पोशाख या खास दिवसासाठी निवडला होता. लग्नाची ही खास इच्छा पूर्ण झाल्याबद्दल तेजस्विनीने कॅप्शनमध्ये २०२४ या वर्षाचे आभार मानले आहेत.

हेही वाचा – २८ वर्षीय अभिनेत्रीने बांधली लग्नगाठ, ‘या’ मालिकेत साकारलेली मुख्य भूमिका; शाही सोहळ्याचे फोटो चर्चेत

पाहा पोस्ट –

तेजस्विनी सुनीलने शेअर केलेल्या फोटोंवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. तिला व श्रीरामला आयुष्यातील या नवीन प्रवासासाठी चाहते शुभेच्छा देत आहेत.

हेही वाचा – “तिचा फोन नंबर…”, मनीषा कोईरालाबद्दल विचारल्यावर काय म्हणालेले नाना पाटेकर? एकेकाळी दोघांच्या अफेअरच्या होत्या चर्चा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तेजस्विनी सुनील हिच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती मागील काही वर्षांपासून सिनेसृष्टीत सक्रिय आहे. तिने आतापर्यंत अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. तिच्या गाजलेल्या मालिकांबद्दल बोलायचं झाल्यास ‘स्वराज्यरक्षक संभाजी’, ‘गाथा नवनाथांची,’ ‘काशीबाई बाजीराव बल्लाळ’ या मालिकांचा समावेश आहे.