प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करण्यासाठी गेल्या काही दिवसांत छोट्या पडद्यावर नवनवीन मालिका सुरू झाल्या आहेत. छोट्या पडद्याचा प्रेक्षकवर्ग मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे टीआरपीसाठी वाहिन्यांमध्ये नेहमीच चढाओढ सुरू असल्याचं पाहायला मिळतं. ‘स्टार प्रवाह’, ‘झी मराठी’, ‘कलर्स मराठी’ यांसारख्या वाहिन्यांवरील मालिकांमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी लोकप्रिय कलाकारांची एन्ट्री तसेच विविध ट्विस्ट आणले जातात.

दर आठवड्याला मालिकांच्या टीआरपीची यादी प्रसिद्धी केली जाते. सध्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील मालिका या शर्यतीत आघाडीवर आहेत. यातही नव्याने सुरू झालेल्या मालिकांनी टॉप १० मालिकांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. ‘मराठी टीआरपी तडका’ या इन्स्टाग्राम पेजवर नुकतीच टीआरपीची यादी शेअर करण्यात आली आहे.

हेही वाचा : चाहत्याच्या हत्येच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या अभिनेता दर्शनसाठी बिर्याणी मागवली? व्हायरल व्हिडीओबाबत पोलीस म्हणाले…

१ जून ते ७ जून या कालावधीमध्ये पुन्हा एकदा ‘ठरलं तर मग’ मालिकेने अव्वल स्थान मिळवलं आहे. गेल्या दीड वर्षांपासून ही मालिका टीआरपीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. तर, दुसऱ्या स्थानावर ईशा केसकरची ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही मालिका आहे. तिसऱ्या चौथ्या स्थानी अनुक्रमे ‘प्रेमाची गोष्ट’ आणि ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिका आहेत.

अभिजीत खांडकेकरची ‘तुझेच मी गीत गात आहे’ २०२२ मध्ये चालू झाली होती. ही मालिका पहिल्यापासून टीआरपीच्या शर्यतीत टॉप – ५ मध्ये आहे. ही मालिका आता १६ जूनला प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

हेही वाचा : “आमचा तुम्हाला बिनशर्त पाठिंबा!” तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी खास पोस्ट; म्हणाली, “इतरांसाठी जगणारा माणूस…”

टॉप – १५ मालिकांची टीआरपी यादी

१. ठरलं तर मग
२. लक्ष्मीच्या पाऊलांनी
३. प्रेमाची गोष्ट
४. तुझेच मी गीत गात आहे
५. घरोघरी मातीच्या चुली
६. येड लागलं प्रेमाचं
७. साधी माणसं
८. अबोली
९. प्रेमाची गोष्ट – महाएपिसोड
१०. मन धागा धागा जोडते नवा
११. लग्नाची बेडी
१२. शुभ विवाह
१३. सुख म्हणजे नक्की काय असतं
१४. मुरांबा
१५. पारू

हेही वाचा : “तुझ्याशिवाय आयुष्य…”, पती सिद्धार्थ चांदेकरसाठी मितालीची रोमँटिक पोस्ट; अभिनेत्याने केली खास कमेंट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, टीआरपीच्या यादीत पहिल्या ‘टॉप १४’ मध्ये ‘स्टार प्रवाह’च्या मालिका आहेत. तर थेट पंधराव्या स्थानी ‘झी मराठी’ वाहिनीची ‘पारू’ मालिका आहे. याशिवाय ‘ठरलं तर मग’ मालिकेबद्दल सांगायचं झालं, तर यामध्ये जुई गडकरी, अमित भानुशाली, प्रियांका तेंडोलकर, सागर तळाशीकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.