काँग्रेस नेते, माजी क्रिकेटर व द कपिल शर्मा शोमध्ये शायरीने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे नवज्योत सिंग सिद्धू सध्या तुरुंगात आहेत. रोज रेड डेथ प्रकरणी ते तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. नवज्योत सिंग सिद्धू तुरुंगात असतानाच त्यांच्या पत्नी नवजोत कौर यांना कर्करोगाचं निदान झालं आहे. स्टेज २ कर्करोगाचं निदान झाल्यानंतर नवजोत कौर यांनी तुरुंगात असलेल्या पतीसाठी भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

नवजोत कौर यांनी पती नवज्योत सिंग सिद्धू यांच्यासाठी ट्वीट केलं आहे. “जो गुन्हा त्यांनी कधी केलाच नाही, त्याची शिक्षा ते भोगत आहेत. या गुन्ह्यातील दोषींना मात्र माफ करण्यात आलं. मी रोज तुमची वाट पाहते. तुमचं दु:ख इतरांबरोबर शेअर करते. वाईट परिस्थिती सुधारणा होईल, अशी मला आशा आहे”, असं त्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा>> जेव्हा इमरान हाश्मीने चांगल्या व वाईट किसबद्दल केलेलं भाष्य, म्हणाला “‘मर्डर’मध्ये मल्लिका शेरावतबरोबर…”

“सत्य खूप शक्तिशाली आहे. पण तुमच्या वेळेची परिक्षा घेतं. कलियुग. स्टेज २च्या कॅन्सरचं निदान झाल्यामुळे तुमची वाट पाहू शकत नाही. आज माझी सर्जरी आहे. यासाठी मला कोणालाही दोष द्यायचा नाही. कारण ही देवाची इच्छा आहे. परफेक्ट”, असं म्हणत नवजोत कौर यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा>> ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ शूटिंगदरम्यान अक्षय कुमारला दुखापत, चित्रपटाच्या सेटवर नेमकं काय घडलं?

navjyot singh sindhu

नवज्योत सिंग सिद्धू पटियाला मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहेत. १९८८ मधील रोड रेज डेथ प्रकरणात त्यांना एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती. मे २०२२पासून ते तुरुंगात आहेत.