‘बिग बॉस १७’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. बिग बॉसच्या यंदाच्या पर्वात बराच ड्रामा आणि ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. बिग बॉसमधील प्रत्येक स्पर्धेकाने आपल्या खेळीवर वेगळा प्रेक्षकवर्ग तयार केला आहे. बिग बॉसच्या घरात सेलिब्रिटींचा मित्र असलेल्या ओरीची (ओरहान अवत्रामणी ) एन्ट्री होणार आहे.

हेही वाचा- “ती मालिकेत राहील किंवा मी”, ‘आई कुठे काय करते’ फेम अनिरुद्ध-संजनामध्ये होते टोकाचे वाद; म्हणाले, “आम्ही दोघं…”

गेल्या काही दिवसांपासून ओरी चांगलाच चर्चेत आहे. बॉलीवूड कलाकारांपासून नीता अंबानींपर्यंत अनेक सेलिब्रिटींसह ओरीचे फोटो व्हायरल होत असतात. या फोटोवरून ओरी नेमका आहे तरी कोण आणि करतो काय, असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. आता ओरी थेट सलमान खानच्या ‘बिग बॉस १७’मध्ये दाखल होणार आहे. ‘बिग बॉस १७’मध्ये ओरी वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून एन्ट्री घेणार आहे. याचा प्रोमोही प्रदर्शित झाला आहे.

दरम्यान, प्रदर्शित करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये सलमान ओरीचे बिग बॉसमध्ये स्वागत करताना दिसत आहे. त्याचबरोबर सलमान ओरीने आणलेल्या सामानावरून त्याची थट्टा करताना दिसत आहे. बिग बॉसमध्ये येताना ओरीने चार ते पाच बॅगा आणल्या आहेत. ओऱीचे हे सामान बघून सलमान म्हणतो, “आम्ही आमच्या घरात सगळ्या सदस्यांना सन्मानाने पाठवतो, भरपूर सामान घेऊन नाही.” सलमान म्हणाला, ‘संपूर्ण जगाला जाणून घ्यायचं आहे, तू नेमकं काय काम करतो?’

हेही वाचा- रूपा गांगुलींना ‘द्रौपदी’ साकारताना हिणवलं गेलं होतं, “बंगाली मुलगी काय हिंदी बोलणार..”, काय घडलं होतं त्यानंतर?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सलमानच्या या प्रश्नावर उत्तर देत ओरी म्हणाला, “मी काय काम करतो हे संपूर्ण जगाला जाणून घ्यायचे आहे, मी खूप काम करतो, मी सकाळी सूर्याबरोबर उठतो आणि रात्री चंद्राबरोबर झोपतो.” ओरीचे हे उत्तर ऐकून सलमानही खूप हसायला लागतो. सलमानने पुढे विचारलं की, “लोकांना हेसुद्धा जाणून घ्यायचे आहे की, तुम्हाला पार्टीला जाण्यासाठी पैसे मिळतात का”, सलमानच्या या प्रश्नावर उत्तर देताना ओरी म्हणाला की, “मला पैसे मिळत नाहीत, उलट माझ्या मॅनेजरला फोन करून लोक मला पार्टीत बोलवतात. माझ्याकडे पाच मॅनेजर आहेत.” ओरीकडे पाच मॅनेजर आहेत हे ऐकून सलमान आश्चर्यचकित झाल्याचे बघायला मिळाले.