Nilesh Sabale & Sharad Upadhye : ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाच्या नव्या सीझनमध्ये यंदाच्या वर्षी डॉ. निलेश साबळेऐवजी लोकप्रिय अभिनेता अभिजीत खांडकेकर सूत्रसंचालन करणार आहे. याचसंदर्भात राशीचक्रकार शरद उपाध्येंनी फेसबूक पोस्ट शेअर करत त्यात निलेश साबळेने काही वर्षांपूर्वी ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर व्यवस्थित वागणूक दिली नव्हती, त्याच्या डोक्यात हवा गेली होती असं म्हटलं होतं.

शरद उपाध्येंनी केलेल्या आरोपांवर आता डॉ. निलेश साबळेने सविस्तर व्हिडीओ शेअर करत प्रत्युत्तर दिलं आहे. “तुम्ही माझ्यासाठी गुरुतुल्य आहात, तुमचा मी मोठा फॅन आहे. कृपया, यापुढे एखाद्या गोष्टीविषयी माहिती घेऊन पोस्ट शेअर करा. तुम्ही पोस्टमध्ये सुरुवातीला लिहिलं होतं की, निलेश साबळेला ‘झी मराठी’ने डच्चू दिला… हे अशाप्रकारे कोणत्याही माहिती नसलेल्या गोष्टीवर व्यक्त होताना जबाबदारीने बोलणं महत्त्वाचं आहे. झी मराठीमध्ये तुमचीही ओळख आहे तुम्ही एकदा फोन करून खरी माहिती घेतली हवी होती. मला ‘झी मराठी’ने बाहेर काढलेलं नाही. सध्या मी सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र असल्याने या प्रोजेक्टमधून मी स्वत:हून माघार घेतली आहे.” असं स्पष्टीकरण डॉ. निलेश साबळेने त्याच्या व्हिडीओमध्ये दिलं.

अभिनेत्याच्या या व्हिडीओवर मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया देत निलेश साबळेला पाठिंबा दिला आहे. अभिनेते प्रवीण तरडे कमेंट करत लिहितात, “किती सुंदर व्यक्त झाला आहेस डॉक्टर… समोरच्या व्यक्तीला न दुखवता मुद्दा कसा मांडावा हे तू दाखवून दिलंस.. तू एक नम्र कलाकार आहेस आणि कायम तसाच रहा”

Nilesh Sabale & Sharad Upadhye
मराठी कलाकारांच्या प्रतिक्रिया

तर, लोकप्रिय गायक सलील कुलकर्णी लिहितात, “शांतपणे… प्रगल्भपणे बोललास… तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे…गडहिंग्लजला तू कॉलेजमध्ये असताना माझ्या मैफिलीला येऊन भेटला होतास… तेव्हापासून जवळून पाहिलं आहे तुला… तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे… छान होऊ दे तुझा चित्रपट ..लवकर भेटू”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Nilesh Sabale & Sharad Upadhye
मराठी कलाकारांच्या प्रतिक्रिया

याशिवाय शिल्पा नवलकर यांनी ‘उत्तम उत्तर दिलंय’ अशी कमेंट निलेश साबळेच्या पोस्टवर केली आहे. सुकन्या मोने, किरण गायकवाड, शर्मिला शिंदे, अभिजीत केळकर, प्रसाद जवादे, अद्वैत दादरकर, कविता मेढेकर, प्रियांका केतकर, संकेत पाठक, निखिल राऊत, रोहित परशुराम अशा अनेक कलाकारांनी निलेशच्या पोस्टवर कमेंट्स करत त्याला पाठिंबा दर्शवला आहे.