Reshma Shinde Ukhana : रेश्मा शिंदेचा लग्नसोहळा शुक्रवारी ( २९ नोव्हेंबर ) थाटामाटात पार पडला. अभिनेत्रीच्या लग्नाची गेल्या आठवड्याभरापासून सर्वत्र जोरदार चर्चा चालू होती. रेश्माने ‘रंग माझा वेगळा’ मालिकेच्या टीमने आयोजित केलेल्या केळवणाचे फोटो शेअर करत तिच्या सर्व चाहत्यांना सुखद दिला होता. यानंतर अभिनेत्रीचं दुसरं केळवण तिच्या लाडक्या मैत्रिणी अनुजा साठे आणि अभिज्ञा भावे यांनी केलं होतं. हळद, मेहंदी असे लग्नाआधीचे विधी पार पडल्यावर आता रेश्माने लग्नगाठ बांधत आयुष्यातील एका नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे.

रेश्माने सर्वात आधी मराठमोळ्या पद्धतीत लग्न लागतानाचे फोटो शेअर केले होते. यामध्ये तिने गुलाबी रंगाची नऊवारी साडी नेसल्याचं पाहायला मिळालं होतं. तर, लग्न लागताना रेश्मा व पवन यांनी दाक्षिणात्य लूक केला होता. या दोघांच्या लूकने सर्वाचं लक्ष वेधून घेतलं होतं. सुंदर अशी साऊथ इंडियन साडी, हातात हिरवा चुडा, कानात झुमके या लूकमध्ये रेश्मा अतिशय सुंदर दिसत होती.

हेही वाचा : नाना पाटेकरांनी अंकशास्त्रावर विश्वास असलेल्या स्पर्धकाला विचारले असे प्रश्न, तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला; पाहा Video

रेश्मा शिंदेचा हिंदीत उखाणा

रेश्माच्या आयुष्यातील या खास प्रसंगी तिचे जवळचे सगळे मित्र-मैत्रिणी तिला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले होते. श्रीरंग देशमुख, मृणाल देशपांडे, अभिजीत खांडकेकर, पौर्णिमा तळवलकर, हर्षदा खानविलकर, विदिषा म्हसकर, शाल्मली, अनघा अतुल, आशुतोष गोखले, भक्ती देसाई, ऋतुजा कुलकर्णी असे ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील सगळे कलाकार रेश्माचा शुभेच्छा देण्यासाठी तिच्या लग्नाला गेले होते.

रेश्माने ( Reshma Shinde ) यावेळी खास हिंदीत उखाणा घेतला. “नाग को नचाने के लिए बजाते हैं बीम, अभी शादी हुई हैं पवन से और सब आगयी हैं मेरी रंग माझा वेगळा की टीम” हा उखाणा घेताच रेश्माच्या मित्रमंडळीने एकच जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

हेही वाचा : “माझी होम मिनिस्टर…”, म्हणत ‘देवमाणूस’ फेम अभिनेत्याने दिली प्रेमाची जाहीर कबुली; मराठी कलाकारांकडून कमेंट्सचा वर्षाव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Reshma Shinde
मराठी अभिनेत्री रेश्मा शिंदेच्या लग्नाला ‘रंग माझा वेगळा’च्या टीमने लावली उपस्थिती ( Reshma Shinde )

दरम्यान, रेश्मा शिंदेच्या ( Reshma Shinde ) कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या ती ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत जानकी ही प्रमुख भूमिका साकारत आहे.