‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा खूप लोकप्रिय विनोदी कार्यक्रम आहे. करोना काळात या कार्यक्रमाला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या शोमधील कलाकारही प्रेक्षकांच्या खूप जवळचे झाले, त्यामुळे जेव्हा काही जण हा शो सोडून गेले तेव्हा प्रेक्षक दुखावले. खासकरून ओंकार भोजने, विशाखा सुभेदार यांचं शोमधून जाणं प्रेक्षकांना रुचलं नाही, त्यामुळे याची खूप चर्चा झाली. शोचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी व सचिन मोटे यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत विशाखाने शो का सोडला त्याबद्दल भाष्य केलं आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडताना ओंकार भोजने काय म्हणाला होता? दिग्दर्शक व निर्माते म्हणाले, “तो खूप…”

भार्गवी चिरमुलेला दिलेल्या मुलाखतीत सचिन मोटे म्हणाले, “विशाखा सोडून गेली तेव्हा आमची खूप चर्चा झाली होती. ती म्हणाली होती की मी मागची १० ते १२ वर्षे हेच करतेय. ती ‘फू बाई फू’च्या पहिल्या पर्वाची विजेती होती. तेव्हापासून ते आतापर्यंत ती स्किट करतेय. तिने बरेच कॉमेडी शो केले, त्यामुळे आता या जॉनरपासून ब्रेक हवाय, असं तिचं म्हणणं होतं. शो सोडून गेलेले सगळे सांगून बाहेर पडले, कोणीही वादामुळे किंवा आमच्याशी खटके उडाल्याने सोडून गेलं नाही.”

“हे नवरे लोक फोटोत…”, हेमांगी कवीच्या ‘त्या’ कमेंटवर वनिता खरातच्या नवऱ्याने दिलं उत्तर; म्हणाला, “मी मनात…”

सचिन गोस्वामी म्हणाले, “जुन्यांना यापेक्षा मोठी संधी मिळाली की ते पुढे जातात, त्यांच्याजागी इतरांना संधी मिळते, त्यामुळे जुन्यांनी जाणंही गरजेचं असतं. विशाखाचं आमच्याशी बोलणं होतं, ती मेसेज करत असते.” सचिन मोटेंनी कलाकारांचा दृष्टीकोनही सांगितला. “या क्षेत्रात येणारा प्रत्येक जण हा कलाकार आहे. त्याला आयुष्यभर एकच गोष्ट करायची असती तर त्याने नोकरी केली असती ना,” असं त्यांनी नमूद केलं.

पुढे सचिन गोस्वामी म्हणाले, “विशाखाला हे माहीत असतं की ती गेल्यामुळे शो बंद होणार आहे, तर ती नक्कीच गेली नसती. कारण या कार्यक्रमात तिचा जीव आहे. ज्या टीमबरोबर आपण इतका छान काळ घालवला, त्याचं नुकसान व्हावं असं कुणाला वाटत नाही. त्यांना माहीत असतं की आपली जागा कुणीतरी घेईल, थोडा काळ लोक हळहळतील पण शो सुरू राहील. नदी वाहते म्हणूनच पाणी स्वच्छ आहे, रुचकर आहे नाही तर त्याचंही डबकं झालं असतं.”

View this post on Instagram

A post shared by Vishakha Subhedar (@subhedarvishakha)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सचिन मोटे व सचिन गोस्वामी स्वतःला ब्रेकची गरज असल्याचंही सांगतात. “आम्हीही जवळपास १० वर्षे हेच काम करतोय, आम्हालाही वाटतं की नाटकं, सिनेमे करावे, मनासारखं काहीतरी करावं पण होत नाही. आम्ही दोघांनीही हा शो सोडला तरी तो सुरूच राहील. आम्ही गेल्याने शो बंद पडणार नाही. चॅनल आम्हाला बोलेल की तुम्ही असं नव्हतं करायला पाहिजे, बाकी काही नाही. आमच्यामुळे अनेक कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे, त्यामुळे आम्ही तडका-फडकी सोडून जाणार नाही,” असं हे दोघेही म्हणाले.