मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरला ओळखले जाते. सई ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सईने मालिकांमध्ये छोट्या भूमिका साकारत अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. सध्या सई ही आघाडीच्या नायिकांपैकी एक आहे. सई ही कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते. सई ताम्हणकर आणि अमृता खानविलकर यांच्या मैत्रीत दुरावा आल्याचे अनेकदा बोललं जातं. नुकतंच सई ताम्हणकरने याबद्दल स्पष्ट मत व्यक्त केले आहे.

सई ताम्हणकरने नुकतंच ‘आर जे सिद्धार्थ कनन’ला एक मुलाखत दिली. त्या मुलाखतीत तिला अमृता खानविलकरबद्दल प्रश्न विचारण्यात आला. मराठी सिनेसृष्टीत अशी चर्चा आहे की ‘सई आणि अमृता यांच्यात सर्वकाही ठिक नाही? तुमच्या मैत्रीत दुरावा आला आहे? अमृताला ज्या भूमिकांसाठी विचारणा करण्यात आली त्यानंतर त्या भूमिका तुझ्याकडे आल्या यामुळे ती नाराज झाली आहे?’ असे अनेक प्रश्न सिद्धार्थने तिला विचारले. यावर सई ताम्हणकरने मला याबद्दल काहीही माहिती नाही, असे ती म्हणाले.
आणखी वाचा : …म्हणून सई ताम्हणकरला तिची ब्रा धुवायला आवडत नाही? व्हिडीओ शेअर करत सांगितले कारण

“पण हे असं तर होणारच ना, अनेकदा एक भूमिका दोन जणांना विचारली जाते. हा आपल्या कामाचा एक भाग आहे. परंतु या कारणावरुन मनात काही आढी ठेवणं मला बरोबर वाटत नाही. असं काही झालंही असेल असे मला तरी वाटत नाही”, असे सई ताम्हणकरने सांगितले.

आणखी वाचा : “… अन् आजही मी त्यावर ठाम” सोनाली कुलकर्णीबद्दल बोलताना अमृता खानविलकरने दिले होते असे उत्तर

त्यापुढे तिला तू आणि अमृता भेटता का? आणि तेव्हा सर्वकाही ठिक असतं का? असे विचारण्यात आले. त्यावर ती हो…असं म्हणाली. इतकंच नाही तर, आता सोशल मीडियावर ज्या चर्चा आहेत, त्याबद्दल आजच मी अमृताला फोन करुन विचारणार असल्याचं सईने यावेळी सांगितले.

आणखी वाचा : “आमच्यात वैर…” अमृता खानविलकरचा फोटो पाहताच सोनाली कुलकर्णी स्पष्टच बोलली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान सई ताम्हणकर आणि अमृता खानविलकर या दोघीही एकमेकांच्या खास मैत्रिणी आहेत. त्या अनेकदा एकत्र फिरतानाचे फोटो शेअर करत असतात. त्यांच्या मैत्रीचे अनेक किस्सेही समोर आले आहेत.