‘बिग बॉस’ हिंदीचं १६वं पर्व सध्या फिनालेच्या दिशेने जात आहे, अशातच शोच्या फिनालेपूर्वी सौंदर्या शर्मा घराबाहेर पडली आहे. घरातील सदस्यांनी तिच्याविरोधात मतदान करून अभिनेत्रीला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतला. सुंबूल तौकीर खान, टीना दत्ता, शालीन भानोत व सौंदर्या शर्मा हे चार स्पर्धक या आठवड्यात नॉमिनेट होते आणि यापैकी कोण घराबाहेर जाईल, याचा निर्णय घेण्याचा अधिकार सलमान खानने घरातील इतर स्पर्धकांना दिला होता. त्यानुसार, सर्वांनी सौंदर्याला घराबाहेर काढलं.

‘आज की पार्टी मेरी तरफ से’! Athiya Shetty-KL Rahulच्या संगीत सोहळ्याचे व्हिडीओ व्हायरल

‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर सौंदर्याने ‘इंडिया टुडे’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिचा घरातील प्रवास व गौतम विगशी असलेल्या तिच्या नात्याबद्दल खुलासा केला. शोच्या सुरुवातीला गौतम व सौंदर्या एकमेकांच्या प्रेमात पडले होते आणि त्यांनी त्यांच्या प्रेमाची कबुली दिली होती. दोघांच्या नात्यावर घरातील सदस्यांनी खोटं म्हणत प्रश्नही उपस्थित केले होते. घराबाहेर पडलेल्या गौतमने आपल्या भावना खऱ्या असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता सौंदर्यानेही गौतमबरोबरच्या नात्यावर भाष्य केलं आहे.

सौंदर्या म्हणाली, “यात चूक किंवा बरोबर असं काहीही नाही. तुम्ही प्रवाहाबरोबर जात असता. आता बाहेर आल्यावर आमचं नातं पुढे कसं जातं ते आम्ही पाहू. आयुष्यात माझ्या समोर येणाऱ्या परिस्थितींवर मी त्यानुसार प्रतिक्रिया देत असते.” दरम्यान, सौंदर्याच्या या म्हणण्यानुसार ती आणि गौतम आता त्यांच्या नात्याबद्दल विचार करतील. त्यामुळे बिग बॉसच्या घरात दिसलेली ही जोडी पुन्हा एकत्र पाहायला मिळेल की नाही हे येत्या काळात कळेल.

“…तर मी तुला मारून टाकेन” रीना रॉय यांनी शत्रुघ्न सिन्हांना दिलेली धमकी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘बिग बॉस १६’ च्या फिनालेला आता तीन आठवडे बाकी आहेत. अशातच घरात शिव ठाकरे, निमृत अहलूवालिया, एमसी स्टॅन, अर्चना गौतम, टीना दत्ता, सुंबूल तौकीर खान, शालीन भानोत आणि प्रियांका चहर चौधरी हे सदस्य आहेत.