Tejashree Pradhan : मराठी नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम करून अभिनेत्री तेजश्री प्रधानने घराघरांत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘होणार सून ह्या घरची’, ‘अगंबाई सासूबाई’ अशा विविध मालिकांमध्ये तेजश्रीने मध्यवर्ती भूमिका साकारल्या होत्या. गेली वर्षभर तेजश्री ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत मुक्ता कोळी प्रमुख भूमिका साकारत होती. मात्र, काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीने या मालिकेतून एक्झिट घेतल्याचं वृत्त समोर आलं. तेजश्रीच्या मालिकेतील एक्झिटनंतर तिचे चाहते नाराज झाल्याचं पाहायला मिळालं.

तेजश्री प्रधानने मुख्य भूमिका साकारलेली ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका गेली दीड वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत होती. या मालिकेला टीआरपी सुद्धा चांगला होता. त्यामुळे, अभिनेत्रीने अचानक या प्रोजेक्टमधून बाहेर पडण्याचा निर्णय का घेतला याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, तिचे चाहते तिला प्रचंड मिस करत असल्याचं तिच्या पोस्टवरच्या कमेंट्स वाचून लक्षात येतं.

तेजश्रीने मालिका सोडली असली, तरी यामध्ये भूमिका साकारणाऱ्या एका खास व्यक्तीची तिने नुकतीच भेट घेतली आहे. ती खास व्यक्ती म्हणजे तेजश्रीची ‘Reel बहीण मिहिका…’ मालिकेत मिहिकाची भूमिका अभिनेत्री अमृता बने साकारत आहे. अमृताबरोबरचा गोड फोटो अभिनेत्रीने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.

तेजश्रीने या फोटोला “Reel बहीण, खरी मैत्रीण” असं कॅप्शन दिलं आहे. तर, पुढे “मला असं वाटतं, फोटो काढताना आपल्याला मागे काय बॅकग्राऊंड आहे याचा फरक पडत नाही.” असंही अभिनेत्रीने या फोटोवर लिहिलं आहे. तेजश्री आणि अमृताचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Tejashree Pradhan
तेजश्री प्रधानची पोस्ट चर्चेत ( Tejashree Pradhan )

दरम्यान, ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर रात्री ८ वाजता प्रसारित केली जाते. मालिकेतून तेजश्री प्रधानने एक्झिट घेतल्यावर तिच्याऐवजी आता या मालिकेत अभिनेत्री स्वरदा ठिगळेची वर्णी लागली आहे.