Tharala Tar Mag Promo : आश्रम केससंदर्भातील सगळे पुरावे महिपतने आधीच नष्ट केलेले असतात. मात्र, नव्याने शोधाशोध करताना अर्जुनला आश्रमात साक्षीच्या पेडंटचा अर्धा तुकडा सापडतो. याचा तुटलेला भाग साक्षीच्या घरी असणार याची पूर्ण खात्री अर्जुनला असते. त्यामुळेच साक्षी शिखरेच्या घरी शोधाशोध करण्यासाठी अर्जुन-सायली जातात. याठिकाणी त्यांना तुटलेलं पेडंट सापडतं. हाच आश्रम केसचा सर्वात मोठा पुरावा असतो.
आश्रम केस संदर्भातील हा मोठा पुरावा हाती लागल्याने अर्जुन प्रचंड आनंदी होतो. आता अर्जुनला पुरावा सापडल्यामुळे प्रेक्षकांना मालिकेत पुन्हा एकदा कोर्टरूम ड्रामा पाहायला मिळणार आहे.
अर्जुन आणि दामिनी आश्रम केसचा तिढा सोडवण्यासाठी पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. यावेळी प्रिया, साक्षी या सगळ्यांची कसून चौकशी होणार आहे. पण, या सगळ्यादरम्यान दामिनी एक मोठा डाव खेळणार आहे. हा खटला दोन वर्षे चालू आहे, अर्जुन सुभेदार फक्त कोर्टाचा वेळ वाया घालवत आहेत आता अजून उशीर नको, अशी ठाम बाजू दामिनी कोर्टात मांडते आणि यानंतर कोर्टाकडून अर्जुनला महत्त्वाचे आदेश दिले जाणार आहेत.
“सदर कोर्ट तुम्हाला फक्त ३० दिवस देत आहे… जुलै महिन्यात या केसचा निकाल लागणार म्हणजे लागणारच!” असं भर कोर्टात स्पष्ट केलं जातं. हे ऐकून अर्जुन-सायलीला धक्का बसतो. कारण, सगळे पुरावे गोळा करण्यासाठी, कोर्टात बाजू मांडण्यासाठी आता अर्जुन-सायलीकडे केवळ ३० दिवस उरणार आहेत.
आता या ३० दिवसात ‘ठरलं तर मग’ मालिकेत कोणत्या घडामोडी घडणार? साक्षी आणि महिपतला शिक्षा होऊन, मधुभाऊंना निर्दोष मुक्त करण्यात अर्जुन यशस्वी होईल का? हे मालिकेत या महिन्यात पाहायला मिळणार आहे.
तब्बल २ वर्षे सुरू असणारा विलास खून प्रकरणाचा तिढा आता लवकरच सुटणार आहे. आता यात अर्जुन की दामिनी कोण बाजी मारणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिका ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर रात्री ८:३० वाजता प्रसारित केली जाते. या मालिकेत जुई गडकरी, अमिता भानुशाली, केतकी पालव, प्रियंका तेंडोलकर, सागर तळाशीकर, ज्योती चांदेकर या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.