छोट्या पडद्यावर सध्या जुई गडकरी आणि अमित भानुशाली यांची प्रमुख भूमिका असलेली ‘ठरलं तर मग’ मालिका अधिराज्य गाजवत आहे. ५ डिसेंबर २०२२ ला सुरू झालेल्या या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं. त्यामुळे गेली वर्षभर मालिका टीआरपीच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. मालिकेतील सायली-अर्जुनवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. आज मालिकेची प्रथम वर्षपूर्ती आहे. त्यामुळे प्रेक्षक कलाकारांना सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा देताना दिसत आहेत. अशातच मालिकेच्या सेटवर एका इच्छाधारी नागिन आहे; जिचा व्हिडीओ अभिनेत्री जुई गडकरीने शेअर केला आहे.

अभिनेत्री जुई गडकरी ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. फोटो, व्हिडीओ व्यतिरिक्त आपली परखड मत मांडतं असते. तसेच चाहत्यांबरोबर मालिकेची किंवा आगामी प्रोजेक्टची माहिती शेअर करत असते. आज जुईने तिच्या इन्स्टाग्रामवर ‘ठरलं तर मग’ मालिकेला १ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने अनेक स्टोरी शेअर केल्या आहेत. त्यामध्ये तिने मालिकेच्या सेटवर इच्छाधारी नागीण असल्याचं देखील सांगितलं आहे.

हेही वाचा – Video: ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला…’, क्रांती रेडकरच्या मुलींनी रात्री १ वाजता गायलं गाणं, व्हिडीओ व्हायरल

जुई गडकरी जितकी साधीभोळी, सोज्वळ आहे. तितकीच ती मजेशीर आहे. ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सेटवरील नेहमी गमतीशीर व्हिडीओ, फोटो शेअर करत असते. नुकतंच जुईने अभिनेत्री दिशा दानडेबरोबरचा छोटा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये दिशा सतत जीभ बाहेर काढून मज्जा करताना दिसत आहे. हाच व्हिडीओ शेअर करत जुईने लिहिलं आहे की, “आमच्या सेटवर इच्छाधारी नागीण आहे.” पुढे अभिनेत्रीने हसण्याचे इमोजी टाकले आहेत.

हेही वाचा – Video: हार्दिक जोशीच्या ‘जाऊ बाई गावात’ शोमध्ये प्रसिद्ध रॅपर एमीवे बंटायच्या एक्स गर्लफ्रेंडची दमदार एन्ट्री, कोण आहे ती जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सध्या या मालिकेत सायली अर्जुनला वैवाहित आयुष्यातील जोडीदाराचं महत्त्व पटवून देत असल्याचा सीक्वेन्स सुरू आहे. पण दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात केव्हा होणार? या ट्रॅकची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.