तितीक्षा तावडे – सिद्धार्थ बोडके यांचा साखरपुडा आणि हळदी समारंभ नुकताच पार पडला. काही दिवसांपूर्वी केळवणाचा फोटो शेअर करत या जोडप्याने इन्स्टाग्रामवर प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. आता तितीक्षा-सिद्धार्थच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे.

तितीक्षा-सिद्धार्थने हळदी समारंभातील खास व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. गौरी नलावडे ऋतुजा बागवे, अनघा अतुल, रसिका सुनील या सगळ्या अभिनेत्री खास लाडक्या मैत्रिणीच्या लग्नासाठी पोहोचल्या आहेत. याशिवाय तितीक्षाची बहीण अभिनेत्री खुशबू तावडे आणि तिचा पती अभिनेता संग्राम साळवी हे दोघंही हळदी समारंभात धमाल करत असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : मेहंदी रंगली गं! पूजा सावंतच्या हातावर सजली सिद्धेशच्या नावाची मेहंदी, फोटो व्हायरल

हळदी समारंभाला तितीक्षाने पांढऱ्या रंगाची साडी नेसून त्यावर फुलांचे आकर्षक दागिने परिधान केले आहेत. तर सिद्धार्थने खास पांढऱ्या रंगाचा सदरा घातल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. यामध्ये अभिनेता “चला उष्टी हळद लागलेली आहे…” असं म्हणत तितीक्षाला मिठी मारत असल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : “सर्रास गोळीबार, खून, ड्रग्ज”, तेजस्विनी पंडितची ‘ती’ पोस्ट चर्चेत; म्हणाली, “आपला महाराष्ट्र…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, साखरपुडा व हळदी समारंभ पार पडल्यावर आता लवकरच ही जोडी लग्नबंधनात अडकणार आहे. सध्या या जोडप्यावर सोशल मीडियासह मराठी कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.