Akshaya Deodhar – Hardeek Joshi Marriage: मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी हार्दिक जोशी-अक्षया देवधर आज(२ डिसेंबर) लग्नबंधनात अडकणार आहेत. मेहंदी, हळदी समारंभ पार पडल्यानंतर अक्षया-हार्दिकचा संगीत सोहळाही मोठ्या धुमधडाक्यात पार पडला. या सोहळ्यातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

राणादा-पाठकबाईंसाठी ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील कलाकारांनी खास डान्स केला. ‘मॅचिंग नवरा’ पाहिजे या गाण्यावर मालिकेतील कलाकार थिरकले. अभिनेत्री वीणा जगतापनेही या संगीत सोहळ्यात ठुमके लावले. या डान्सचा व्हिडीओ अमोल नाईक यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. अमोल नाईक यांनी मालिकेत राणादाच्या मित्राची बरकतची भूमिका साकारली होती. हार्दिक व अक्षयाचे ते चांगले मित्र आहेत.

हेही वाचा>> Video: हळदी कार्यक्रमात बेभान होऊन नाचले राणादा-पाठकबाई, मित्रांनी उचलून घेतलं अन्…; अक्षया-हार्दिकचा डान्स व्हिडीओ व्हायरल

हेही वाचा>> Video: लुंगी नेसून किरण मानेंचा अपूर्वा व विकाससह ‘सामी सामी’ गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल

अक्षयाने संगीत सोहळ्यासाठी गाऊन परिधान केला होता. तर हार्दिकने कोट परिधान करत खास लूक केला होता. नातेवाईक, मित्रपरिवार व कुटुंबियांच्या उपस्थितीत अक्षया-हार्दिकच्या संगीत सोहळ्याचं जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं. त्यांच्या संगीत सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

पाहा व्हिडीओ –

हेही पाहा>> Photos: ‘#अहा लगीन’ राणादाच्या हातावर रंगली पाठकबाईंच्या नावाची मेहंदी; अक्षया देवधर व हार्दिक जोशीच्या मेहंदी सोहळ्यातील खास फोटो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली राणादा-पाठकबाईंची जोडी खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे साथीदार होणार असल्यामुळे चाहतेही खुश आहेत. हार्दिक-अक्षयाच्या ऑन स्क्रीन जोडीला चाहत्यांनी पसंती दर्शविली होती. हार्दिक-अक्षयाच्या लग्नासाठी अहा हा हॅशटॅगही तयार करण्यात आला आहे.