scorecardresearch

Premium

मुलाखत देताना कॅमेऱ्यासमोर आलेल्या एकाला अभिनेत्रीने पाठीत घातला धपाटा, तर दुसऱ्यावर रागात ओरडली, Video Viral

मुलाखतीत अडथळा आणणाऱ्या दोघांवर अभिनेत्री चिडली, रागात ओरडत म्हणाली…

Telugu Actress Lakshmi Manchu hits man for blocking interview
पाहा अभिनेत्रीचा व्हायरल व्हिडीओ (फोटो – स्क्रीनशॉट)

तेलुगू अभिनेता लक्ष्मी मंचूने नुकतीच ‘SIIMA 2023’ या पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावली. यंदाचा सोहळा दुबईमध्ये आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये लक्ष्मी मंचूने केलेली कृती चर्चेचा विषय ठरली आहे.

“पंतप्रधान नक्कीच चिंतेत असतील”, कंगना रणौतचे नरेंद्र मोदींबद्दल विधान; म्हणाली, “त्यांना भीती वाटेलच कारण…”

prathana behere
“तुझा आवडता हॉलिवूड किंवा बॉलिवूड अभिनेता कोण?” प्रार्थना बेहेरे म्हणाली “त्या अभिनेत्याने…”
aarti solanki
दिवसातून ८ तास चालणं, एकदाच जेवण अन्…; ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीने केलंय तब्बल ५० किलो वजन कमी
Sukanya troll
“तिने जास्त दारू प्यायली आहे…,” डान्समुळे ट्रोल करणाऱ्याला सुकन्या मोनेंनी दिलं सडेतोड उत्तर, म्हणाल्या…
aai kuthe kay karte fame gauri kulkarni
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने गुपचूप उरकला साखरपुडा? ‘त्या’ फोटोमुळे चर्चांना उधाण, नेटकरी म्हणाले…

या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये लक्ष्मी अत्यंत ग्लॅमरस दिसत आहे. यात ती रेड कार्पेटवर मुलाखत देत आहे. ती बोलत असताना एक माणूस कॅमेऱ्यासमोर आला आणि शॉट खराब झाला. यावर लक्ष्मीला राग आला आणि तिने त्याच्या पाठीत मारलं. त्यानंतर आणखी एक जण आला आणि कॅमेऱ्याच्या समोरून जाऊ लागला. त्याला लक्ष्मी म्हणाली, “कॅमेराच्या मागे जा यार. बेसिक.” यानंतर मुलाखत घेणारी ‘कट कट’ म्हणताना दिसते.

लक्ष्मी मंचू ही अभिनेते मोहन बाबू आणि दिवंगत विद्या देवी यांची मुलगी आहे. तिने २०११ मध्ये आलेल्या ‘अनगनगा ओ धीरुडू’ या चित्रपटातून तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. तिने आतापर्यंत ‘लक्ष्मी बॉम्ब’, ‘डब्ल्यू/ओ राम’, ‘पिट्टा कथलू’, ‘मॉन्स्टर’ आणि ‘गुंटूर टॉकीज’सह अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. लक्ष्मी मंचूने २००६ मध्ये अँडी श्रीनिवासनशी लग्न केले आणि त्यांना एक मुलगी आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Telugu actress lakshmi manchu hits man for blocking interview shouts at another siima 2023 hrc

First published on: 22-09-2023 at 10:04 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×