करिना कपूर खान ही बॉलीवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. त्याच्या रुपावर आणि अभिनयावर अनेक चाहते फिदा आहेत. दिगदर्शक करण जोहरनेही तिचे गुणगाण गायले आहेत.
मला वाटतं इथे फक्त एकच करिना असू शकते. माझे तिच्याशी खूप जवळचे मैत्रीसंबंध आहेत. एक व्यक्ती म्हणून ती मला आवडते. तिच्यात विशिष्ट अशी ऊर्जा, शक्ती आहे. करिनाने तिच्या कामामुळे चित्रपटसृष्टीत एक उंची गाठली आहे आणि तिच्याशी कोणाचीही तुलना करणे हे चुकीचेच ठरेल, असे करण एका कार्यक्रमात म्हणाला.
बहुतेकवेळा करिना आणि नवोदित अभनेत्री आलिया भटची तुलना केली जाते. करणच्या आगामी हम्प्टी शर्मा की दुल्हनिया चित्रपटात आलियाने करिनाच्या चाहतीची भूमिका साकारली आहे. त्यावर करण म्हणाला की, आलिया ही नवीन आहे. ती खूप मेहनत करून अजून पुढे जाईल आणि स्वतःची आलिया भट अशी ओळख निर्माण करेल नाकी दुस-या अभिनेत्रींशी तिची तुलना केली जाईल. वरुण धवन आणि आलियाची प्रमुख भूमिका असलेला हम्प्टी शर्मा की दुल्हनिया ११ जुलैला प्रदर्शित होत आहे.