टायगरच्या ‘बागी 3’ने केला ‘हा’ विक्रम

जाणून घ्या, चित्रपटाने कोणता विक्रम केला आहे

अॅक्शन सीनमुळे कायम चर्चेत असणाऱ्या टायगर श्रॉफचा ‘बागी ३’ हा चित्रपट अलिकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आला. ६ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. या चित्रपटात मोठ्या प्रमाणावर अॅक्शन सीनचा भरणा केल्यामुळे या चित्रपटाला तुफान लोकप्रियता मिळाली असून हा चित्रपट या वर्षीचा सर्वात यशस्वी चित्रपट ठरला आहे. देशात लॉकडाउन सुरु होण्यापूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई केली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाने पहिल्या दिवसाच्या कमाईमध्ये ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटावरही मात केल्याचं पाहायला मिळालं.

‘बागी ३’ प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर काही दिवसातच देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. त्यामुळे या काळात चित्रपटगृहेदेखील बंद करण्यात आली. मात्र तरीदेखील लॉकडाउनपूर्वी या चित्रपटाने भरघोस कमाई केली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी १७.५० कोटींची कमाई केली असून जगभरात १३५.८ कोटींचा गल्ला जमवला आहे. इतकंच नाही तर लॉकडाउन होण्याच्या एक दिवस आधी या चित्रपटाने ६.५ कोटी रुपयांचं कलेक्शन केलं आहे.

दरम्यान, या चित्रपटात टायगर श्रॉफ, श्रद्धा कपूर आणि रितेश देशमुख यांची मुख्य भूमिका आहे. ‘बागी 3’ हा चित्रपट २०२० मधील सर्वात जास्त ओपनिंग मिळालेला चित्रपट ठरला आहे.  यापूर्वी ‘तान्हाजी: द अनसंग वॉरिअर’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी १५.१० कोटी, ‘लव्ह आज कल’ने १२.४० कोटी, ‘स्ट्रीट डान्सर 3D’ ने १०.२६ कोटी आणि ‘शुभ मंगल सावधान’ या चित्रपटाने ९.५५ कोटी रूपयांची कमाई केली होती. या चित्रपटानंतर ‘टायगर हिरोपंती 2’ या चित्रपट झळकणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Tiger shroff baaghi 3 get higest opening on box office in 2020 ssj