scorecardresearch

हिरोपंती २ फ्लॉप झाल्यानंतर टायगर श्रॉफची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, “चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर…”

टायगर श्रॉफ सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतो.

हिरोपंती २ फ्लॉप झाल्यानंतर टायगर श्रॉफची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, “चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर…”
हिरोपंती २ या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपयश मिळाले.

टायगर श्रॉफ बॉलिवूडमधला सध्याचा आघाडीचा अभिनेता आहे. त्याच्या अ‍ॅक्शन चित्रपटांचा वेगळा चाहतावर्ग आहे. त्याने ‘हिरोपंती’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाचा सिक्वेल काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ‘हिरोपंती २’ मध्ये त्याच्यासह तारा सुतारिया आणि नवाजुद्दीन सिद्दिकी हे कलाकार होते. या चित्रपटाला प्रेक्षकांना खूश करता आले नाही. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. चित्रपटाला प्रेक्षकांचा अपेक्षित असलेला प्रतिसाद न मिळाल्याने टायगरने याबद्दलचे नाराजी व्यक्त केली आहे.

टायगर श्रॉफ सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या सिनेकलाकारांपैकी एक आहे. तो इन्स्टाग्रामवर सतत फोटो-व्हिडीओ शेअर करत असतो. या माध्यमातून तो चाहत्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतो. नुकतीच त्याने इन्स्टाग्रामवर ‘Ask’ असे म्हणत स्टोरी पोस्ट केली होती. या स्टोरीवरुन टायगरच्या चाहत्यांनी त्याला बरेचसे प्रश्न विचारले. दरम्यान एका चाहत्याने त्याला “हिरोपंती २ केल्यानंतर तुम्हाला कसे वाटत आहे” असा प्रश्न विचारला. तेव्हा त्या प्रश्नाचे उत्तर देत त्याने नवीन स्टोरी शेअर केली. यामध्ये त्याने “चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी खूप मजा आली… पण प्रदर्शन झाल्यानंतर वाट लागली” असे लिहिले होते.

आणखी वाचा – ‘विक्रम वेधा’ चित्रपटातील हृतिकचा संवाद पोस्ट करत सबा आझाद म्हणाली, “आता प्रतीक्षा..”

चाहत्यांशी केलेल्या इंटरअ‍ॅक्शनमध्ये टायगरला ‘तुमचा आवडता दाक्षिणात्य अभिनेता कोण’ असा सवाल एका चाहत्याने केला. त्यावर त्याने ‘आयकॉनिक स्टार अल्लू अर्जुन’ असे उत्तर दिले. तसेच एका चाहत्याच्या ‘तुझा बडे मियाँ छोटे मियाँ चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे’ या प्रश्नाचे उत्तर देताना त्याने ‘ख्रिसमस २०२३’ असे लिहिलेला त्याचा आणि अक्षय कुमारचा फोटो स्टोरीवर शेअर केला.

आणखी वाचा – ‘द काश्मीर फाईल्स’ने रचला नवा विक्रम, ‘या’ गोष्टीत ‘ब्रह्मास्त्र’ला टाकले मागे

काही दिवसांपूर्वी त्याने क्रिती सेनॉनसह करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती. तेव्हा बोलताना त्याने उघडपणे हिरोपंती २ च्या अपयशाचे दुख होत असल्याचे सांगितले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या