‘आलू का पराठा…’, उर्फीचा अजब लूक सोशल मीडियावर व्हायरल

उर्फी या आधीही तिच्या बोल्ड लूकमुळे ट्रोल झाली आहे.

urfi javed, urfi javed video viral,
उर्फी या आधीही तिच्या बोल्ड लूकमुळे ट्रोल झाली आहे.

‘बिग बॉस’ ओटीटीमुळे प्रसिद्धी मिळालेली उर्फी जावेद सतत चर्चेत असते. उर्फी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. उर्फी तिच्या बोल्ड लूक्समुळे बऱ्याचवेळा ट्रोल होताना दिसते. नुकताच उर्फिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे उर्फी पुन्हा एकदा ट्रोल झाली आहे.

उर्फीचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केला आहे. या व्हिडीओत उर्फीने कपड्यांच्या जागी सिल्वर फॉइल पेपर ड्रेस म्हणून परिधान केला आहे. उर्फीचा हा ड्रेस ऑफ शोल्डर ड्रेस आहे. एवढचं काय तर तिने फॉइल पेपरचा मुकुट घातला आहे. उर्फीने हे सगळं हॉलिवूडमधील लोकप्रिय गायिका रिहानाच्या एका मेट गाला लूकला कॉपी करत केलं आहे. असा ड्रेस रिहानाने २०१८ मध्ये परिधान केला होता.

आणखी वाचा : आमिरसोबत लग्नाच्या चर्चांवर अखेर फातिमाने सोडलं मौन म्हणाली…

उर्फीचा हा लूक नेटकऱ्यांना काही आवडलेला नाही. तिच्या या व्हिडीओर कमेंट करत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘देवा हिने तर सिलव्हर फॉइलचे महत्त्व बदलले आहे. RIP सिलव्हर फॉइल यूजर्स.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘खूप कौशल्य आहे हिच्यात, मेट गाला नाही पण मीना बाजारत उभ करा.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘आता तर मला विश्वास झाला आहे की ही खरचं गरीब आहे. हिच्याकडे कपडे नाहीत.’ आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘आलू का पराठा लग रही है’, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Urfi javed got trolled for wearing silver foil video went viral dcp

ताज्या बातम्या