चित्रविचित्र कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत असणारी उर्फी जावेद अडचणीत आली आहे. सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन केल्यामुळे उर्फीला मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदच्या कपड्यांवर आक्षेप घेत तिच्याविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई पोलिसांनी तक्रारीची दखल घेत उर्फीला नोटीस बजावली. आज (१४ जानेवारी) उर्फीला अंबोली पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलवलं होतं. नग्नता तसेच अश्लीलतेचा प्रचार करत असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी उर्फीवर केला होता. नुकतंच उर्फीने अंबोली पोलीस ठाण्यात येऊन स्वतःचा जबाब नोंदवला आहे.

आणखी वाचा : ‘गांधी गोडसे’ चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी व्यक्त केली मनातील भीती; म्हणाले “सेन्सॉर बोर्ड…”

‘एबीपी’च्या वृत्तानुसार आपल्या जबाबात उर्फी म्हणाली की, “मी एक भारतीय आहे, मला माझ्या आवडीचे कपडे परिधान करायचा पूर्ण अधिकार आहे. भारताच्या राज्यघटनेने मला हा अधिकार दिला आहे. शिवाय मी माझ्या कामाच्या अनुषंगाने हे कपडे परिधान करते. त्यावरून माझं फोटोशूट होतं, कधीकधी कामाच्या गडबडीत मला कपडे बदलायला वेळ मिळत नाही तेव्हाच फोटोग्राफर बाहेर येऊन फोटोज काढतात आणि ते व्हायरल होतात. आता हे व्हायरल होणारे फोटो मी कसे थांबवणार?”

आणखी वाचा : ३९ हजार ५२६ महिलांवर अत्याचार, २५०६ बलात्कार…चित्रा वाघ, उर्फी पुराण झालं असेल तर यावरही बोला!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

असा उलटप्रश्नच तिने या जबाबात विचारला आहे. एकूणच उर्फी आणि चित्रा वाघ यांच्यातील एक प्रकरण दिवसेंदिवस चिघळत आहे. उर्फी जावेदने चित्रा वाघ यांच्याविरोधात शुक्रवारी(१३ जानेवारी) पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. उर्फीचे वकील नितीन सातपुते यांनी याबाबत माहिती दिली आहे. आता यावर पोलीस नेमकं काय पाऊल उचलणार त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.