Vijay Devarakonda Engagement Rumours Rashmika Mandanna Shares First Instagram Post : रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या साखरपुड्याच्या बातमीने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे आणि त्यांच्या चाहत्यांना या बातमीने खूप आनंद झाला आहे. असे म्हटले जात आहे की, या जोडप्याने शुक्रवारी (३ ऑक्टोबर) हैदराबादमध्ये एका खासगी समारंभात साखरपुडा केला. दरम्यान, साखरपुड्याच्या या पसरलेल्या या वृत्तानंतर रश्मिकाने तिची पहिली इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्री रश्मिकाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. साखरपुड्याबद्दल काहीही उघड करण्याऐवजी, तिने तिच्या आगामी ‘द गर्लफ्रेंड’ चित्रपटाचा टीझर शेअर केला आणि चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीखही जाहीर केली.

“मला माहीत आहे की, तुम्ही सगळे याची वाट पाहत होता”, असे तिने या पोस्टमध्ये लिहिले. हा चित्रपट ७ नोव्हेंबरला तेलुगू, तमीळ, हिंदी, कन्नड व मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचेही तिने जाहीर केले.

रश्मिकाने तिच्या आगामी चित्रपटाचा टीझर शेअर करताच, चाहत्यांनी तिच्या इन्स्टाग्रामवर कमेंट्स केल्या आहेत. वापरकर्त्यांनी तिला तिच्या साखरपुड्याबद्दल विचारले; तर काहींनी तिच्या चित्रपटाच्या टीझरचे कौतुक केले आणि त्याबाबत उत्साह व्यक्त केला.

रश्मिका आणि विजय देवरकोंडा यांच्या साखरपुड्याच्या बातम्यांनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. रिपोर्टनुसार, या दोघांनी ही ‘गुड न्यूज’ अद्याप अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. मात्र, वृत्तांनुसार हे दोघेही २०२६ च्या सुरुवातीला फेब्रुवारी महिन्यात लग्नगाठ बांधणार असल्याचे बोलले जात आहे.

रश्मिका आणि विजय आपापल्या कामात व्यग्र आहेत. रश्मिका लवकरच ‘थामा’ या आगामी हॉरर कॉमेडी फिल्ममध्ये आयुष्मान खुरानाबरोबर दिसणार आहे, जो २०२५ च्या दिवाळीत प्रदर्शित होईल. तर, विजय ‘राजधानी’ नावाच्या एका गुप्तहेर कथांवर आधारित चित्रपटात दिसला होता.

विजय आणि रश्मिका दोघेही बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांनीही कधीही आपले नाते अधिकृतपणे जाहीर केले नाही. या दोघांना अनेकदा रेस्टॉरंटमध्ये फिरताना आणि अनेक वेळा ट्रिप एन्जॉय करताना पाहिले गेले आहे.