मागच्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांच्या डेटिंगच्या चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहेत. दोघंही अनेकदा एकमेकांसोबत टाइम स्पेड करताना किंवा डिनर- लंचला जाताना दिसतात. अशात लवकरच हे दोघं लग्नाच्या बेडीत अडकतील अशा चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या होत्या. आता या सर्वच चर्चांवर अभिनेता विजय देवरकोंडानं मौन सोडलं आहे. त्यानं नुकतंच केलेलं ट्वीट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

विजय देवरकोंडानं रश्मिकासोबत लग्न करण्याच्या सर्व चर्चांना पूर्णविराम देत एक ट्वीट केलं आहे. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. त्यानं लिहिलं, ‘नेहमीप्रमाणे मूर्खपणा…’ त्याचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झालं आहे. अर्थात विजयनं त्याच्या या ट्वीटमध्ये कोणत्याच गोष्टीचा उल्लेख केलेला नाही. पण त्यानं रश्मिकाला डेट करत असल्याच्या चर्चांना नकारही दिलेला नाही.

आणखी वाचा- Gangubai Kathiawadi: ‘मेरी जान’ गाण्यात आलिया- शांतनूचा कारमधील रोमान्स चर्चेत, पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. ज्यात गीता गोविंदम (२०१८), डियर कॉम्रेड (२०१९) या चित्रपटांचा समावेश आहे. मोठ्या पडद्यावरील या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं. त्यांचे हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले. त्यानंतर हे दोघंही खऱ्या आयुष्यातही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र या दोघांनीही याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.