अनुष्का आणि विराट कोहली म्हणजे एक सुंदर व क्युट जोडपं. या दोघींची जोडी एकदम परफेक्ट आहे. सध्या हे दोघेही युकेमध्ये आहेत. याच दरम्यान दोघांच्या लग्नाआधीचा अनसीन फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या फोटोंमध्ये विराट अनुष्काची ओढणी खेचताना दिसून येतोय.
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या लग्नाच्या आधीपासूनच त्यांच्यातील रोमॅण्टिक अंदाजाची चर्चा सुरू झाली होती. विराटचं अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर त्यानं पत्नी अनुष्काला फ्लाइंग किस दिलेले फोटो यापूर्वी खूप व्हायरल झाले होते. दोघांच्या लग्नाआधीचा असाच आणखी एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि तो चर्चेचा विषय देखील ठरतोय. विराट-अनुष्काच्या एक फॅन पेजने हा फोटो शेअर केलाय. varushka_forever या पेजने अनुष्का आणि विराटच्या लग्नाआधीचे काही फोटोज शेअर केले आहेत. क्रिकेटर झहीर खानच्या रिसेप्शनमधला हा फोटो आहे. या फोटोमध्ये तो अनुष्कासोबत मस्ती करत अनुष्काची ओढणी खेचून डान्स करताना दिसून आला.
View this post on Instagram
अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने २०१७ मध्ये जल्लोषात लग्न केलं. लग्नापूर्वी हे दोघं बरेच वर्ष प्रेमसंबंधांमध्येही होते. असे असतानाही लग्नाच्या काही महिन्यापूर्वीच विराट व अनुष्का एकत्र दिसू लागले होते. यामुळेच दोघांच्या प्रेमसंबंधाची चर्चा सुरू झाली होती. दरम्यान लग्नानंतरही यांनी कधीही आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर खासगी आयुष्यातील फोटो अपलोड करण्याचा सपाटा लावला नाही. पण तरीही त्यांचे फॅन्स दोघांचे एकूण एक अपडेट घेऊन त्यांच्याबाबत माहिती मिळवण्यात उत्सुक असतात, हे यावरून सिद्ध झालंय.
सध्या अनुष्का शर्मा पती विराट कोहली आणि मुलगी वामिकासोबत युकेमध्ये क्विलीटी टाईम घालवत आहे. विराट कोहली त्याच्या इंग्लंडमधील सीरिजमध्ये व्यस्त आहे. तर अनुष्का मुलगी वामिकासोबत आपला वेळ घालवतेय. गेल्याच्या महिन्यातच विराट आणि अनुष्का हे दोघेही साउथॅम्प्टनमध्ये दाखल झाले आहेत. विराटच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी ते दोघे युकेमध्ये आले आहेत.