बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. शाहरुखने त्याच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. शाहरुखच्या चाहत्यांमध्ये महिलांची संख्या जास्त आहे. तर शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी खान यांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. पण एक अशी वेळ होती जेव्हा गौरी शाहरुखला सोडण्याचा विचार करत होती. याविषयी गौरीने खुलासा केला आहे.

करण जोहरने होस्ट केलेल्या ‘कॉफी विथ करण’च्या एका एपिसोडमध्ये गौरीने याची कबुली दिली होती. यावेळी ती म्हणाली, “लग्न करण्याचा निर्णय घेण्यासाठी आम्ही खूप लहान आहोत असं मला वाटत होतं. म्हणून, मी एक छोटा ब्रेक घेतला. तो माझ्यासाठी खूप पजेसिव्ह होता आणि मी ते मला सहन होतं नव्हत. तिला स्वत:साठी काही वेळ हवा होता आणि त्यामुळे तिने ब्रेक घेतला आणि नंतर ती त्याच्याकडे परतली.”

आणखी वाचा : …म्हणून समांथाने लग्नाची ‘ती’ साडी नागा चैतन्यच्या कुटुंबाला केली परत

आणखी वाचा : “योगीजी हरले नाही तर भारतात परत येणार नाही”, केआरकेने केले होते ट्वीट पण निवडणुकीचे निकाल लागताच…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाहरुख खानने २५ ऑक्टोबर १९९१ रोजी गौरीशी लग्न केले. या दोघांना तीन मुले आहेत. आर्यन, सुहाना आणि अबराम अशी त्यांच्या मुलांची नावं आहेत. दरम्यान, शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू या भाषेत प्रदर्शित होणार आहे. येत्या २५ जानेवारी २०२३ रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.