When Sunil Dutt opened up about the pain of losing wife Nargis : ज्येष्ठ अभिनेते सुनील दत्त हे त्यांच्या पत्नी नर्गिसच्या खूप जवळचे होते. लग्नाच्या काही वर्षांनी नर्गिस यांचे कर्करोगाने निधन झाले. त्यानंतर सुनील दत्त यांना मोठा धक्का बसला.

सुनील दत्त यांनी एका मुलाखतीत त्यांच्या पत्नीच्या मृत्यूबद्दल उघडपणे सांगितले होते. त्यांनी सांगितले की, त्यांची पत्नी नर्गिस यांच्या मृत्यूनंतर त्यांचे जीवन किती कठीण झाले होते आणि वाईट काळात ते स्वतःला कसे सांभाळत होते.

तबस्सुम यांच्या मुलाखतीदरम्यान सुनील दत्त यांनी सांगितले होते की, त्यांची पत्नी नर्गिस यांना गमावल्याने त्यांच्या आयुष्यावर काय परिणाम झाला. ते म्हणाले, “मी याबद्दल सत्य सांगू शकत नाही. असे वाटत असते की, आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर तो जगू शकणार नाही; पण मला माहीत नाही की, लोक कसे जगू शकतील. मीही असा विचार करायचो आणि आता मी स्वतः जगत आहे. सध्या माझे आयुष्य ज्या पद्धतीने चालले आहे, त्यामुळे मला कधी कधी ‘मदर इंडिया’मधील (दुनिया में हम आये हैं, तो जीना ही पडेगा) हे गाणे आठवते, जे तिने गायले होते.” सुनील दत्त एका चॅट शोमध्ये म्हणाले होते, “ती एक उत्तम अभिनेत्री आणि खूप चांगली व्यक्ती होती. तिनं माझ्या आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी आणल्या.”

सुनील दत्त यांनी टॉक शोमध्ये खुलासा केला होता की, नर्गिस यांच्या मृत्यूनंतर त्यांनी त्यांच्या दिवंगत पत्नीने चालवलेल्या स्पास्टिक मुलांसाठीच्या शाळेत वेळ घालवण्यात स्वतःला व्यग्र ठेवले. त्यांनी कर्करोग रुग्णालयात चिल्ड्रन ऑफ द सिक नावाची एक सोसायटीदेखील उघडली आहे, जिथे ते दर रविवारी कर्करोगातून वाचलेल्यांबरोबर वेळ घालवायचे. “माझ्या पत्नीनं मागे सोडलेलं काम, जर मी माझ्या आयुष्यात ते पूर्ण करू शकलो, तर मला असं वाटेल की, मी काहीतरी साध्य केलं आहे,” असे सुनील दत्त म्हणाले होते.

‘मदर इंडिया’च्या सेटवर झाली होती भेट

सुनील आणि नर्गिस यांची भेट मेहबूब खान यांच्या ‘मदर इंडिया’ (१९५७)च्या सेटवर झाली. सुनील आणि नर्गिस यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सुनील दत्त आणि नर्गिस एकमेकांच्या जवळ आले. ११ मार्च १९५८ रोजी त्यांचे लग्न झाले. या जोडप्याला तीन मुले होती, ज्यांची नावे संजय दत्त, नम्रता दत्त व प्रिया दत्त आहेत. सुनील दत्त यांचे २००५ मध्ये निधन झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१९८० मध्ये नर्गिस स्वादुपिंडाच्या कर्करोगाने ग्रस्त झाल्या होत्य. न्यू यॉर्कमधील मेमोरियल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटरमध्ये त्यांच्यावर बराच काळ उपचार करण्यात आले; परंतु त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. भारतात परतल्यानंतर नर्गिस यांची प्रकृती आणखी बिघडली. त्यानंतर त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु त्या कोमात गेल्या. डॉक्टरांच्या सर्व प्रयत्नांनंतरही त्यांना वाचवणे शक्य झाले नाही. १९८१ मध्ये नर्गिस यांचे निधन झाले. त्यावेळी त्या ५१ वर्षांच्या होत्या.