करीना कपूर ही बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी आणि प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. ती दोन दशकांहून अधिक काळ ती चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. रेफ्युजी या चित्रपटातून पदार्पण केलेल्या करीनाने चमेली, जब वी मेट, ओंकारा, ३ इडियट्स, वीरे दी वेडिंग, बॉडीगार्ड आणि इतर अनेक चित्रपटांत महत्वपूर्ण भूमिका बाजावल्या आहेत. पण करीनाच्या सर्व चित्रपटांपैकी ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटात तिने साकारलेली पूजा उर्फ ‘​​पू’ ही सर्वाधिक लोकप्रिय व्यक्तिरेखा ठरली. या चित्रपटाला २१ वर्ष पूर्ण होऊनही प्रेक्षक तिला विसरलेले नाहीत.

आणखी वाचा : आपला तिरंगा, आपला अभिमान… ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला कलाकारांचा पाठिंबा

आता, अलीकडेच, करीनाने ‘पू’ या तिच्या व्यक्तिरेखेबद्दल खुलासा करताना ‘भविष्यात ‘पू’ची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट येऊ शकतो’, असे संकेत तिने दिले आहेत. एका मुलाखतीत बोलताना ती म्हणाली, मला वाटतं की हे पात्र तेव्हाच्या पिढीपेक्षा आताच्या पिढीच्या जास्त मनाजवळचं आहे. ‘पू’ ज्या पद्धतीने वागते, बोलते, चालते, बोलताना ज्या प्रकारची भाषा वापरते त्याच्याशी आताची पिढी जास्त कनेक्ट होऊ शकते. हे कनेक्शन इतर गोष्टीपेक्षा ‘पू’च्या व्यक्तिमत्वामुळे तयार झाले आहे. त्यामुळे कुणास ठाऊक? भविष्यात ‘पू’ची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट बनवलाही जाऊ शकतो.”

‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करण जोहरने केले होते. हा चित्रपट २००१ साली प्रदर्शित झाला होता. या कौटुंबिक चित्रपटात अमिताभ बच्चन, जया बच्चन, शाहरुख खान, काजोल, करीना कपूर आणि हृतिक रोशन यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. त्यामुळे आता करीनाने संगितल्याप्रमाणे खरोखर ‘पू’वर आधारित चित्रपट येणार का हे येत्या काळात समोर येईलच.

हेही वाचा : “चित्रपटावर बहिष्कार टाकू नका कारण…” ‘लाल सिंग चड्ढा’ला थंड प्रतिसाद मिळताच करीना कपूरचं प्रेक्षकांना आवाहन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान करीना सध्या तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या लाल सिंग चढ्ढा या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्यासोबतच ती लवकरच सुजॉय घोषच्या थ्रिलर चित्रपटातही दिसणार आहे. तिचा हा आगामी चित्रपट जपानी पुस्तक ‘द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स’वर आधारित असेल.