एक मुलगा दुकानात जातो. दुकानदार खाली मान घालून कॅलक्युलेटरवर हिशेब करत असतो. मुलगा : काका एक मॅगीचं पाकीट द्याना. दुकानदार : दोन मिनिटं थांबा हं जरा. मुलगा : नाही. नाही. बनवून नको, तशीच द्या. दुकानदार अवाक होऊन मुलाकडे पाहातो आणि गुपचूप मॅगीचं पाकीट काढून देतो.