पुणेकर – अडीच डझनची पेटी दाखवा. पण मी पेटी उघडून बघणार.

व्यापारी – बघा ना साहेब. पण भाव कमी नाही होणार.

पुणेकर – अरे अस्सल रत्नागिरी दिसतोय.

व्यापारी – हो म्हणजे काय…

पुणेकर मनात म्हणतो – मला कोणीच फसवू शकत नाही. मी आंबे थोडेच बघत होतो. मी पेटीतला कागद बघितला. रत्नागिरीचा स्थानिक वर्तमानपत्राचा कागद होता.

व्यापारी मनात – अरे पुणेकरा, मी पण हाडाचा व्यापारी आहे. मी रत्नागिरीहून फक्त रद्दीच मागवतो. बाकी माल कर्नाटकचा आणतो.