हास्यतरंग : आईचा फोन…

Marathi Jokes : ती पहाटे चार वाजता येणार आहे.

latest marathi jokes
वाचा भन्नाट मराठी विनोद

नवरा : आगं! ऐकलस का, आत्ताच आईचा फोन आला होता ती पहाटे चार वाजता येणार आहे.

बायको : काय? अहो, त्या आत्ताच येऊन गेल्या ना चार महिन्यापुर्वी
आणि इतक्या सक्काळी सक्काळी.
एक तर उद्या रविवार आहे.
उद्या मी उशिरा उठणार होते.
एवढ्या सकाळी त्यांना रिक्षा मिळेल का?
आणि हो मी नास्त्याला काही करणार नाही.
त्यांना चहा बिस्किटंच खावी लागतील.

नवरा : अगं! तुझी आई येणार आहे.

बायको : काय सांगता! दोन महिन्यानंतर येणार आहे माझी आई.
एक काम करा माझ्याकडे रिक्षावाल्याचा फोन नंबर आहे.
त्याला सांगा पहाटे चारला यायला.
आणि मी ही जरा उद्या लवकरच उठेन.
इडलीच पीठ भिजवायला लागेल,
आणि हो उपमा पण करावा लागेल,
आईला खूप आवडतो माझ्या.

चला, कामाला लागा…!!

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Latest funny marathi joke husband and wife and mothe in law daily marathi joke latest marathi joke hasa dd

ताज्या बातम्या