मुंबईत ६९२ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईतल्या रुग्णांची संख्या ११ हजार २१९ इतकी झाली आहे. आज मुंबईत २५ मृत्यू झाले अशीही माहिती देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने ही माहिती दिली आहे. मुंबईत आत्तापर्यंत ४३७ रुग्णांचा मृत्यू करोनामुळे झाला आहे.

धारावीत ५० रुग्ण वाढले

मुंबईतल्या धारावीत आज नवे ५० रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे धारावीतली रुग्णसंख्या ७८३ झाली आहे. आज धारावीत एक मृत्यू झाला आहे. धारावीत आत्तापर्यंत करोनाची लागण होऊन २१ जणांचा मृत्यू झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑर्थर रोड तुरुंगातील स्वयंपाकीच्या माध्यमातून एका बराकीतील ७२ कैद्यांना करोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या कैद्यांना मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून तुरुंगाबाहेर क्वारंटाइन करण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात येईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पालघर येथे सांगितले