30 September 2020

News Flash

धुळे हत्याकांडाचा जलदगती न्यायालयात चालणार खटला – देवेंद्र फडणवीस

मागच्या आठवडयात धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात जमावाने मुलं पळवणारी टोळी समजून पाच जणांची ठेचून हत्या केली होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागच्या आठवडयात धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात जमावाने मुलं पळवणारी टोळी समजून पाच जणांची ठेचून हत्या केली होती. निष्पाप नागरिकांचा या मारहाणीत मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. राज्य सरकारने आता या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

ही घटना अत्यंत दुर्देवी असून जे कोणी जबाबदार आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. कोणाचीही गय करणार नाही. जलदगती न्यायालयात खटला चालवून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत सांगितले.

या प्रकरणी पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. दशरथ पिंपळसे असे या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात एकूण २६ आरोपींना आत्तापर्यंत अटक करण्यात आली असून आणखी १५ आरोपींचा शोध सुरू आहे अशी माहिती धुळे पोलीस अधीक्षक एम. रामकुमार यांनी दिली.

नेमके काय घडले होते १ जुलैच्या दिवशी?

रविवारी १ जुलैला राईनपाडा येथे आठवडी बाजार भरला होता. ५ लोक बाजाराच्या ठिकाणी एसटीतून उतरले होते. दरम्यान, त्यातील एक जण एका लहान मुलीशी बोलण्याचा प्रयत्न करीत होता. यामुळे गावातल्या काही लोकांचा ते लहान मुले पळवणारे असल्याचा समज झाला. त्यानंतर ही अफवा बाजार परिसरात पसरल्याने तेथे मोठ्या प्रमाणावर जमाव गोळा झाला. यांपैकी सुमारे ३५ जणांनी या पाच जणांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यामधील १२ जण राईनपाडा गावाचे रहिवासी होते. मारहाण इतकी क्रूर आणि बेदम पद्धतीने करण्यात आली की या मारहाणीतच या सगळ्यांचा जीव गेला. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियातून व्हायरल झाला होता. त्यामुळे ही घटना समोर आली. सुरुवातीला लोक त्यांना चपलांनी मारत होते. त्यानंतर काही तरुणांनी त्यांना राईनपाडा गावच्या ग्रामपंचायत कार्यालयात डांबले आणि काठ्यांनी बेदम मारहाण केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2018 8:29 pm

Web Title: dhule mob lynching cm devendra fadanvis
टॅग Dhule
Next Stories
1 रत्नागिरीत पर्यटकांना धबधबे, धरणांवर जाण्यास बंदी
2 खड्ड्यातील पाण्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू
3 संभाजी भिडें विरोधात संभाजी ब्रिगेडकडून पोलिसांकडे तक्रार
Just Now!
X