मुंबई : विविध तांत्रिक कामांसाठी रविवारी,  ४ ऑगस्ट रोजी रेल्वेच्या तीनही मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मुख्य मार्गावर कल्याण ते ठाणे अप जलद मार्ग, हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे दोन्ही मार्ग, पश्चिम रेल्वेवरील सांताक्रुझ ते गोरेगावदरम्यान अप व डाऊन धिम्या मार्गावर ब्लॉक असणार आहे. यामुळे हार्बर मार्ग सोडता मध्य रेल्वे मुख्य मार्ग व पश्चिम रेल्वेवरील उपनगरी रेल्वे पंधरा मिनिटे उशिराने धावतील.

मध्य रेल्वे-मुख्य मार्ग

कुठे – कल्याण ते ठाणे अप जलद मार्ग

कधी – स. ११.२० ते दु. ३.५० वा.

परिणाम – कल्याण ते ठाणेदरम्यान अप जलद मार्गावरील उपनगरी रेल्वे अप धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. त्यानंतर पुन्हा ठाणे ते सीएसएमटीदरम्यान जलद मार्गावर गाडय़ा धावतील. मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा स्थानकांत जलद गाडय़ा थांबतील.

हार्बर मार्ग

कुठे – सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे दोन्ही मार्ग

कधी – अप मार्ग- स. ११.१० ते दु. ३.४० आणि डाऊन मार्ग- स. ११.४० ते दु. ४.१० वा.

परिणाम – सीएसएमटी, वडाळा ते वाशी, बेलापूर, पनवेल, वांद्रे, गोरेगावदरम्यानच्या उपनगरी रेल्वे   ब्लॉकवेळी रद्द राहतील. पनवेल ते कुर्लादरम्यान विशेष उपनगरी रेल्वे  फेऱ्या सोडण्यात येतील.

पश्चिम रेल्वे

कुठे – सांताक्रुझ ते गोरेगावदरम्यान अप व डाऊन धिमा मार्ग

कधी – स. १०.३५ ते दु. ३.३५ वा.

परिणाम – अप व डाऊन धिम्या मार्गावरील उपनगरी रेल्वे  सांताक्रुझ ते गोरेगावदरम्यान जलद मार्गावर धावणार आहेत. राम मंदिर स्थानकात मात्र उपनगरी रेल्वे   थांबणार नाहीत.