News Flash

रिक्षा-टॅक्सींमधील मीटरबदल रखडले

रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ होऊन पाच दिवस उलटले तरीही बहुसंख्य रिक्षा-टॅक्सीचालक प्रवाशांकडून जुन्याच दरानुसार प्रवास भाडे घेत आहेत.

मीटरमध्ये फेरबदल करण्यासाठी पूर्व द्रुतगती महामार्गावर घाटकोपर येथे रिक्षांची रांग लागली होती. (छायाचित्र : दीपक जोशी)

‘चिप’चा तुटवडा; चालकांमध्येही उदासीनता

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ होऊन पाच दिवस उलटले तरीही बहुसंख्य रिक्षा-टॅक्सीचालक प्रवाशांकडून जुन्याच दरानुसार प्रवास भाडे घेत आहेत.  मीटरमधील भाडेदर बदलासाठी आवश्यक असलेल्या ‘चिप’चा तुटवडा असून मीटरमध्ये बदल करण्यासाठी रिक्षा-टॅक्सीचालक पुढे येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. या कारणांमुळे मुंबई महानगरातील बहुतांश भागांत जुनेच भाडेदर आकारले जात असून प्रवाशांना मात्र दिलासा मिळत आहे.

मुंबई महानगरात १ मार्च २०२१ पासून रिक्षा-टॅक्सीची भाडेवाढ लागू करण्यात आली. रिक्षा व टॅक्सीचे सुरुवातीचे किमान भाडे तीन रुपयांनी महागले आहे. त्यामुळे रिक्षाचे भाडे १८ रुपयांवरून २१ रुपये आणि टॅक्सीचे भाडे २२ रुपयांवरून २५ रुपये झाले आहे. नवीन भाडेदर वसुलीसाठी मीटरमध्ये तीन महिन्यांत आवश्यक बदल करण्याच्या सूचना चालकांना करण्यात आल्या आहेत. तोपर्यंत चालकांना नवीन दरपत्रक दाखवून भाडे वसूल करण्याची मुभाही देण्यात आली आहे, परंतु अनेकांना अद्याप दरपत्रकही मिळालेले नाही. संघटनांकडून ते घेण्यास चालक उत्सुक नसल्याने प्रवाशांकडून जुन्याच दराने भाडेदर वसुली केली जात आहे.

आरटीओतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन भाडेदरासाठी मीटर रिकॅ लिब्रेशन (बदल) करावे लागणार आहे. त्यासाठी मीटरमध्ये एक नवीन चिप बसवावी लागते. यामध्ये मीटरमध्ये पडणाऱ्या भाडेदराची सगळी माहिती साठवून ठेवलेली असते. हे काम परिवहन विभागाकडून काही संस्थांना देण्यात आले आहे. उत्पादकांकडून चिप मिळाल्यानंतर या संस्थांमार्फत मीटरमध्ये चिप बसवून देण्यात येणार आहे. त्यानंतर आरटीओत येऊन चालकाला रिक्षा पासिंग करावी लागेल, परंतु चिपच्या तुटवडय़ामुळे पुढील प्रक्रिया रखडली आहे.

‘एकही वाहन आलेले नाही’

वाहनाच्या शेवटच्या क्र मांकानुसार मीटरचे रिकॅ लिब्रेशन के ले जाणार आहे. त्यासाठी आरटीओकडूनच तारखा देण्यात आल्या आहे. १ ते ७ मार्चदरम्यान शेवटचा शून्य क्र मांक, त्यानंतर ८ ते १४ मार्चदरम्यान शेवटचा एक क्रमांक असलेल्या रिक्षा, टॅक्सींच्या मीटरमध्ये बदल करण्याच्या सूचना आहेत. १० मे २०२१ पर्यंत बदल होणे अपेक्षित आहे. मार्च महिन्याचे पाच दिवस उलटले तरीही एकही रिक्षा, टॅक्सी आरटीओत पासिंगसाठी आलेली नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

माझ्या रिक्षाचे मीटर रिकॅ लिब्रेशन एक महिन्यानी आहे. तोपर्यंत नवीन दरपत्रक सोबत ठेवून भाडे घेण्याची परवानगी आहे. आता कु ठे प्रवासी मिळत आहेत. हे पाहता मी नवीन दरपत्रकच घेतलेले नाही की आकारणी करीत नाही. जेव्हा मीटर रिकॅलिब्रेशन होईल, तेव्हा पाहू.

– विश्वनाथ चव्हाण, रिक्षाचालक, गोरेगाव

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 6, 2021 1:39 am

Web Title: meter change in auto and taxi got delayed dd 70
Next Stories
1 करोनाकाळात नेत्रविकाराकडे काणाडोळा
2 सरकार-गणेश मंडळांमध्ये वादाची चिन्हे
3 लसीकरण मोहिमेचे विकेंद्रीकरण आवश्यक
Just Now!
X