News Flash

दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता

निकाल कधी लागणार याची प्रतीक्षा संपली

महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल ८ जूनला म्हणजेच उद्या लागणार असल्याचे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे.निकाल तयार असून तो शुक्रवार ८ जून रोजी लावण्यात येईल असे मंडळाने स्पष्ट केले आहे. दुपारी १ वाजता वाजता दहावीचा निकाल जाहीर करण्यात येईल. त्यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येतील.

कुठे पाहाल निकाल?

http://mahresult.nic.in/ या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल बघता येईल. सीबीएसईचा दहावीचा निकाल लागल्यानंतर या निकालाकडे राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षा मार्च महिन्यामध्ये झाल्या होत्या. एकूण१८ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यामुळे तब्बल १८ लाख विद्यार्थ्यांचे या महत्त्वाच्या निकालांकडे लक्ष लागले आहे. प्रशासकीय समस्यांमुळे निकाल जाहीर करण्यास किंचित विलंब होत असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थी निकालाची वाट बघत होते अखेर ही प्रतीक्षा संपली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2018 2:46 pm

Web Title: msbshse to declare ssc class 10 results tomorrow
Next Stories
1 Maharashtra SSC 10th result 2018: आज दहावीचा निकाल
2 नारायण राणेंनी घेतली छगन भुजबळांची भेट
3 मुंबईत पावसामुळे सखल भागात साचले पाणी, रेल्वे वाहतूक विस्कळीत
Just Now!
X