रेल्वेमार्गावरील महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी कामासाठी रविवारी मध्य व हार्बर मार्गावर मेगाब्लॉकचे नियोजन केले आहे.
मध्य रेल्वे
- कुठे : ठाणे ते कल्याण यांदरम्यान डाऊन जलद मार्गावर
- कधी : सकाळी १०.३० ते दुपारी ३.३० वा.
- परिणाम : ब्लॉकदरम्यान ठाणे ते कल्याण यांदरम्यान डाऊन जलद मार्गावरील वाहतूक डाऊन धिम्या मार्गावरून चालवण्यात येईल. त्यामुळे कल्याणकडे जाणाऱ्या जलद गाडय़ा ठाणे ते कल्याण यांदरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील. तसेच यादरम्यान अप तसेच डाऊन जलद गाडय़ा त्यांच्या नेहमीच्या थांब्यांशिवाय मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या स्थानकांवरही थांबतील. ब्लॉकच्या कालावधीत काही सेवा रद्द राहणार असून जलद तसेच धिम्या मार्गावरील वाहतूक वेळापत्रकापेक्षा १५ ते २० मिनिटे उशिराने धावण्याची शक्यता आहे.
*********
हार्बर मार्ग
- कुठे : पनवेल ते नेरुळ यांदरम्यान अप व डाऊन मार्गावर
- कधी : सकाळी ११.२० ते दुपारी ३.५० वा.
- परिणाम : ब्लॉकदरम्यान पनवेल ते नेरुळ यांदरम्यान अप तसेच डाऊन मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद असेल. ट्रान्स हार्बर मार्गावरून पनवेलकडे जाणाऱ्या गाडय़ा ब्लॉकदरम्यान रद्द राहतील. प्रवाशांच्या सोयीसाठी हार्बर मार्गावर काही विशेष गाडय़ा चालवल्या जाणार आहेत.