News Flash

धक्कादायक! मुंबईतील आर्थर रोड कारागृहात आणखी ८१ कैद्यांना करोनाची बाधा

एकूण करोनाबाधित कैद्यांची संख्या पोहोचली १५८वर

ऑर्थर रोड कारागृहाचे संग्रहित छायाचित्र.

मुंबईत करोनाचा विळखा वाढतच चालला असल्याचे रोजच्या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. त्यातच कारागृहातील कैद्यांबाबतही आता चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण, आर्थर रोड येथील मुंबई मध्यवर्ती कारागृहातील आणखी ८१ कैद्यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे एकूण करोनाबाधित कैद्यांची संख्या १५८ वर पोहोचली आहे.

कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न तसेच इतर नागरी, वैद्यकीय आणि वाहतूक समस्या यांमुळे राज्य शासनाने उभारलेल्या माहुल येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये कैद्यांना ठेवणे शक्य नसल्याने आर्थर रोड येथील कारागृहातील सर्कल नंबर ३ आणि १० येथे त्यांच्यासाठी  क्वारंटाइन वॉर्ड उभारण्यात आला आहे. या ठिकाणी चाचणी केल्यानंतर आज (रविवार) नव्याने ८१ कैद्यांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पण्ण झाले.

दरम्यान, जे. जे. रुग्णालयातील सात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या एका पथकाने रुग्णालयातील या वॉर्डला भेट दिली. यापुढे हे पथक या वॉर्डला दररोज भेट देणार असून इथल्या परिस्थितीचा आढावा घेणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2020 7:35 pm

Web Title: shocking another 81 inmates at mumbais arthur road jail were hit by a corona virus total no reached on 158 aau 85
टॅग : Coronavirus
Next Stories
1 आर्थर रोडनंतर भायखळा कारागृहातील महिला कैद्याला करोनाची लागण
2 मुंबई पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अश्विनी भिडे म्हणतात…
3 मुंबई पोलिसांच्या मदतीला धावून आले विराट-अनुष्का
Just Now!
X