श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासातर्फे सुरू करण्यात येत असलेल्या डायलिसिस केंद्राचे उद्घाटन २६ जानेवारी रोजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात न्यासाच्या डायलिसिस केंद्रासह प्रतीक्षालय, शैक्षणिक व आरोग्य सुविधा केंद्राच्या इमारतीचेही उद्घाटन होणार आहे. तळमजल्यावर भाविकांसाठी रांगव्यवस्थापन, पहिल्या मजल्यावर बहुउद्देशीय सभागृह, दुसऱ्या मजल्यावर महाप्रसादासाठी स्वयंपाकघर, तिसऱ्या मजल्यावर डायलिसिस् केंद्र, चौथ्या मजल्यावर ग्रंथालय/अभ्यासिका आणि पाचव्या मजल्यावर विकलांग मुलांसाठीचे सुसज्ज केंद्र आहे. डायलिसिस केंद्रासाठी अंधेरी येथील वीरा देसाई जैन संघ यांचे सहकार्य लाभले आहे. येथे २१ डायलिसिस युनिट आहेत.

पवारांना गंडा आणि बंधन यातला फरक कसा कळणार?
उध्दव ठाकरेंचे प्रत्युत्तर
विशेष प्रतिनिधी, मुंबई<br />‘राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी आयुष्यभर दुसऱ्यांना गंडविले. त्यांना गंडा आणि बंधन यातला फरक कसा कळणार? या निमित्ताने त्यांच्या मनातील विष बाहेर आले आहे,’ असा टोला लगावत शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी पवारांवर टीकास्त्र सोडले.
शिवसेनेच्या शिवबंधन कार्यक्रमावरील पवार यांच्या उपहासात्मक टीकेला ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले. ‘शिवबंधन कार्यक्रमामुळे जादूटोणा कायद्यानुसार काय कारवाई होईल, याची वाट पहात आहोत, असे अशी टीका पवारांनी केली होती़  त्यावर ‘पवार उद्या रक्षाबंधनालाही विरोध करतील. तसे झाले तर जादूटोणा कायदा आम्ही मोडून टाकू. पवारांना गंडा व बंधन यातला फरकच कळलेला नाही, असे ठाकरे म्हणाल़े