News Flash

सुशांत सिंह आत्महत्या: बिहार पोलिसांकडून अंकिता लोखंडेची चौकशी

बिहार पोलिसांसोबत अंकिता लोखंडेचा PRO

बिहार पोलिसांकडून सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी अंकिता लोखंडेची सुमारे तासभर चौकशी करण्यात आली. बिहार पोलीस काही वेळापूर्वीच अंकिता लोखंडेच्या घरी पोहचले. त्यांनी सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात अभिनेत्री अंकिता लोखंडेची चौकशी केली.  रिया सुशांतला त्रास देत होती’, अशी माहिती सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेनेदेखील बिहार पोलिसांनी दिल्याचं समजतं आहे. काही वेळापूर्वीच त्यांनी अंकिता लोखंडचं निवासस्थान सोडलं. ANI ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

२०१९ मध्ये अंकिताने ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. यावेळी तिला शुभेच्छा देण्यासाठी सुशांतने तिच्याशी संपर्क साधला होता. यावेळी बोलत असताना रियामुळे त्याला त्रास होत असल्याचं त्याने अंकिताला सांगितलं होतं. याचा पुरावा म्हणून अंकिताने सुशांतचे मेसेज देखील पोलिसांना दाखवले होते.

सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येनंतर संपूर्ण बॉलिवूड हादरलं होतं. सुशांतचा बळी बॉलिवूडमधल्या गटबाजीमुळे आणि घराणेशाहीमुळे गेला असाही आरोप करण्यात आला. त्यानंतर त्याची जवळची मैत्रीण रिया चक्रवर्तीचीही चौकशी करण्यात आली. तसंच सुशांत सिंह राजपूतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेचीही आज चौकशी करण्यात आली. अंकिता लोखंडेने रिया चक्रवर्ती सुशांतला त्रास देत होती असं म्हटलं आहे. त्यानंतर आता आज तिची चौकशी करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2020 11:11 pm

Web Title: team of bihar police left from the residence of actor ankita lokhande in mumbai along with her pro after questioning her in connection with the death of actor sushant singh rajput scj 81
टॅग : Sushant Singh Rajput
Next Stories
1 करोना संकटात मुंबईचा आर्थिक मदतीसाठी संघर्ष, चार महिन्यात फक्त ८६ कोटींची मदत; RTI मधून उघड
2 अयोध्येत ३० एकर जमिनीवर भव्य बौद्धविहार उभारणार – रामदास आठवले
3 महाराष्ट्र देशासाठी कायमच दिशादर्शक-शरद पवार