मुंबई : तीन अल्पवयीन मुलांनी नऊ वर्षाच्या मुलावरच अत्याचार केल्याची घटना घाटकोपर येथे घडली. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिन्ही मुलांना ताब्यात घेतले असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

पीडित मुलगा आणि त्याचे मित्र एकाच भागात राहणारे आहेत. गेल्या काही दिवसांपासून १२ ते १५ वयोगटातील ही मुले अल्पवयीन मुलाला एका घरात नेऊन त्याच्यावर अत्याचार करीत होती. पीडित मुलाने ही बाब त्याच्या आईला सांगितली. त्याच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.

हेही वाचा – वसंत मोरे यांची शरद पवारांशी भेट, काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्यासाठी मध्यस्थीची विनंती

हेही वाचा – पक्षांतरबंदी कायद्यामुळे आमदार लंकेंचा पक्षप्रवेश टळला ?

हेही वाचा – महाविकास आघाडीचे अखेर ठरले! ‘हा’ पक्ष लढवणार बुलढाण्याची लोकसभा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करूत तिन्ही मुलांना ताब्यात घेतले. पीडित मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.