लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मध्य रेल्वेचा प्रत्येक विभाग, कारखान्यातील भंगार साहित्य हटविण्यासाठी ‘शून्य भंगार’ मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत एप्रिल – ऑगस्ट २०२३ या कालावधीत भंगार विक्रीतून १५०.८१ कोटी रुपये महसूल जमा झाला आहे.

मध्य रेल्वेने कालबाह्य इंजिन, डिझेलवर धावणारे इंजिन, रेल्वे रूळ, जुने किंवा अपघातात नुकसान झालेले इंजिन / डबे यांसह विविध प्रकारच्या भंगाराची विल्हेवाट लावण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. मध्य रेल्वेने १ एप्रिलपासून ३१ ऑगस्टपर्यंत १५०.८१ कोटी रुपयांची भंगाराची विक्री केली आहे. या मोहिमेअंतर्गत माटुंगा आगारातील २७.१२ कोटी रुपयांच्या भंगाराची विक्री करण्यात आली. मुंबई विभागातील २५.९७ कोटी रुपये, भुसावळ विभागातील २२.२५ कोटी रुपये, पुणे विभागातील १६.०८ कोटी रुपये, भुसावळच्या विद्युत इंजिन आगारातील १६.०५ कोटी रुपये, सोलापूर विभागातील ११.३६ कोटी रुपये, नागपूर विभागातील १०.०७ कोटी रुपये, मध्य रेल्वेवरील इतर ठिकाणच्या विभागांतील एकत्रित २१.९१ कोटी रुपयांच्या भंगाराची विक्री करण्यात आली.

आणखी वाचा-कोकण मंडळाच्या ‘पीएमएवाय’मधील घरांसाठी आता वार्षिक सहा लाख रुपयांची उत्पन्न मर्यादा

रेल्वे बोर्डाचे २०२३-२४ वर्षात ३०० कोटी रुपयांच्या भंगाराची विक्री करण्याचे उद्दिष्ट्य निश्चित केले आहे. ऑगस्ट २०२३ पर्यंत ३७.१० टक्क्यांनी भंगार विक्रीत वाढ झाली आहे, असे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नको असलेले ६,०८६ मेट्रिक टन रूळ, ९ लोकोमोटिव्ह, १६० डबे आणि ६१ वाघिणी (वॅगन्स) यांची भंगारात विक्री करण्यात आली.