मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी, रविवार, १४ एप्रिल रोजी मध्य, पश्चिम रेल्वेकडून दिवसकालीन मेगाब्लॉक घेण्यात येणार असून त्यामुळे रेल्वे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या विविध मार्गांवर रविवारी अभियांत्रिकी व देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार असून त्यामुळे लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे

मुख्य मार्ग

कुठे : ठाणे कल्याण अप आणि धीम्या मार्गावर

कधी : सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत ठाणे – कल्याणदरम्यानची अप आणि धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. या लोकल डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा आणि ठाणे या स्थानकांत थांबतील. तर, ठाकुर्ली, कोपर येथे लोकल थांबा नसल्याने आणि लोकल वेळापत्रकाच्या १० ते १५ मिनिटे उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा…घराचा ताबा विलंबाने मिळाल्यास खरेदीदार व्याजासाठी पात्र, उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे खरेदीदारांना दिलासा

हार्बर मार्ग

कुठे : कुर्ला – वाशी अप आणि डाऊन मार्गावर
कधी : सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – पनवेल / बेलापूर / वाशी अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – कुर्ला आणि पनवेल – वाशी दरम्यान विशेष लोकल धावतील.

हेही वाचा…उन्हाच्या तडाख्याने मुंबईकर हैराण

पश्चिम रेल्वे

कुठे : बोरिवली – गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावर
कधी : सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परिणाम : ब्लॉक कालावधीत बोरिवली – गोरेगाव दरम्यान सर्व अप आणि डाऊन जलद लोकल धीम्या मार्गावर धावतील. तसेच काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत.