मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुंबई सीमाशुल्क विभागाकडून (Mumbai Customs Department at International Airport) मोठी कारवाई करण्यात आली आहे. विमानतळावर १३ कोटी रुपयांचे कोकेन ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. एका परदेशी नागरिकाकडून हे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. एवढचं नाही तर त्या नागरिकाच्या पोटात लपवून ठेवलेल्या कोकेनच्या ८७ कॅप्सूलही आढळून आल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी त्या परदेशी नागरिकाला अटक केली आहे.
पोटात लपवले होते ८७ कॅप्सूल
यापूर्वी म्हणजे २८ ऑगस्ट रोजी मुंबई विमानतळवरील कस्टम विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी एका व्यक्तीला अटक केली होती. या व्यक्तीला नंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर या व्यक्तीच्या पोटातून एक दोन नव्हे तर तब्बल ८७ कोकेनच्या कॅप्सूल बाहेर काढण्यात आल्या होत्या. तीन दिवसात त्या व्यक्तीने या कोकेनच्या कॅप्सूल खाल्या होत्या, असंही समोर आलं आहे. पश्चिम आफ्रिकेतील देश घाना येऊन ही व्यक्ती आलेली होती.
हेही वाचा- चांगभलं : ‘थोडेसे माय-बापासाठी’! निराधार एक हजार वयोवृद्धांना आधाराची काठी
कारवाईमुळे खळबळ
ऐन गणेशोत्सवात करण्यात आलेल्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात आढळलेल्या या अंमली पदार्थांमुळे अनेक शंका व्यक्त केल्या जात आहेत. त्याअनुशांगाने पोलिसांनी तपासही सुरु केला आहे.