मुंबई : मध्य रेल्वेवरील लोणावळा- मळवली विभागात उड्डाणपुलाच्या पायाभूत कामासाठी तीन दिवसीय ब्लाॅक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक ६ ते ८ एप्रिल दरम्यान असेल. या कालावधीत लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात आणि पुणे लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा – मळवली विभागात प्रस्तावित उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी ४ स्टील्स उभारणीसाठी, समांतर रेल्वे फाटकाच्या (लेव्हल क्राॅसिंग गेट) जागी विशेष वाहतूक ब्लाॅक घेण्यात येणार आहे. मळवली – लोणावळा दरम्यानच्या अप आणि डाऊन मार्गावरील हा ब्लॉक ६ ते ८ एप्रिल दरम्यान घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. ब्लाॅक काळात रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ब्लॉकमुळे होणारे परिणाम

ब्लॉक १

रविवार, ६ एप्रिल रोजी दुपारी २.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत

लांबपल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल

  • गाडी क्रमांक २२१५९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चेन्नई एक्स्प्रेस लोणावळा येथे दुपारी ४.०५ वाजेपर्यंत थांबवण्यात येईल.
  • गाडी क्रमांक १७२२२ लोकमान्य टिळक टर्मिनस – काकीनाडा एक्स्प्रेस कर्जत येथे दुपारी ३.२० वाजेपर्यंत थांबवण्यात येईल.
  • गाडी क्रमांक २२१९४ ग्वाल्हेर – दौंड एक्स्प्रेस चौक येथे १० मिनिटांसाठी थांबवण्यात येईल.

पुणे लोकलच्या वेळापत्रकात बदल

  • गाडी क्रमांक ९९८१४ पुणे – लोणावळा लोकल आणि गाडी क्रमांक ९९८१६ शिवाजी नगर – लोणावळा लोकल मळवलीपर्यंत चालवण्यात येईल. मळवली – लोणावळा लोकल सेवा उपलब्ध नसेल.
  • गाडी क्रमांक ९९८१३ लोणावळा – पुणे लोकल आणि गाडी क्रमांक ९९८१५ लोणावळा – शिवाजी नगर लोकल मळवली येथून चालवण्यात येईल. ही लोकल लोणावळ्याऐवजी मळवली येथून सुटेल.

ब्लॉक २

सोमवार, ७ एप्रिल रोजी दुपारी १.०५ ते दुपारी २.३५ पर्यंत

पुणे लोकलच्या वेळापत्रकात बदल

  • गाडी क्रमांक ९९८१६ शिवाजी नगर – लोणावळा लोकल मळवलीपर्यंत चालवण्यात येईल. मळवली – लोणावळा लोकल सेवा उपलब्ध नसेल.
  • गाडी क्रमांक ९९८१३ लोणावळा – पुणे लोकल मळवली येथून चालवण्यात येईल. ही लोकल लोणावळ्याऐवजी मळवली येथून सुटेल.

ब्लॉक ३

मंगळवार, ८ एप्रिल रोजी दुपारी १.०५ ते दुपारी ३.०५ पर्यंत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुणे लोकलच्या वेळापत्रकात बदल

  • गाडी क्रमांक ९९८१६ शिवाजी नगर – लोणावळा लोकल मळवलीपर्यंत चालवण्यात येईल. मळवली – लोणावळा लोकल सेवा उपलब्ध नसेल.
  • गाडी क्रमांक ९९८१३ लोणावळा – पुणे लोकल मळवली येथून चालवण्यात येईल. ही लोकल लोणावळ्याऐवजी मळवली येथून सुटेल.