मुंबई : हार्बर मार्गावरील वाशी येथे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग (इलेक्ट्रॉनिक सिग्नल नियंत्रण प्रणाली) सुरू करण्याच्या कामासाठी बुधवारी रात्रीपासून शनिवारी रात्रीपर्यंत ब्लाॅक घेण्यात येणार आहे. हा ब्लाॅक रात्री १०.४५ ते पहाटे ३.४५ पर्यंत अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर असेल. त्यामुळे हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत होईल. तसेच ब्लाॅकमुळे शनिवारपर्यंत लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी मध्यरात्री काही अप दिशेच्या लोकल अंशत: रद्द करण्यात येणार आहेत.
- बेलापूर स्थानक येथून रात्री ८.५४ वाजता सुटणारी बेलापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल वाशी स्थानक येथे अंशत: रद्द करण्यात येईल.
- बेलापूर स्थानक येथून रात्री ९.१६ वाजता सुटणारी बेलापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल वडाळा रोड स्थानक येथे अंशत: रद्द करण्यात येईल.
- वांद्रे स्थानक येथून रात्री १० वाजता सुटणारी वांद्रे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल वडाळा रोड स्थानक येथे अंशत: रद्द करण्यात येईल.
- पनवेल स्थानक येथून रात्री १०.५० वाजता आणि रात्री ११.३२ वाजता सुटणाऱ्या पनवेल – वाशी लोकल नेरुळ स्थानकावर अंशत: रद्द केली जाईल.
गुरुवारी पहाटे काही डाऊन दिशेच्या लोकल इथून सुटतील.
- पहाटे ५.०६ आणि पहाटे ५.५२ ची वडाळा रोड – पनवेल लोकल वडाळा रोड स्थानकाऐवजी नेरुळ स्थानक येथून सुटतील. त्यामुळे वडाळा रोड – नेरुळदरम्यान लोकल सेवा उपलब्ध नसेल.
- पहाटे ४.५२ आणि पहाटे ५.३० ची सीएसएमटी – पनवेल लोकल सीएसएमटीऐवजी नेरुळ स्थानकतून सुटतील. त्यामुळे सीएसएमटी – नेरुळदरम्यान लोकल सेवा उपलब्ध नसेल.
- पहाटे ५.१० ची सीएसएमटी – गोरेगाव लोकल सीएसएमटीऐवजी वडाळा रोड स्थानक येथून सुटेल. त्यामुळे सीएसएमटी – वडाळा रोडदरम्यान लोकल सेवा उपलब्ध नसेल.
गुरुवारी आणि शुक्रवारी पहाटेची डाऊन दिशेची लोकल इथून सुटेल.
- पहाटे ५.१० ची सीएसएमटी – गोरेगाव लोकल सीएसएमटीऐवजी वडाळा रोड येथून सुटेल. त्यामुळे सीएसएमटी – वडाळा रोड दरम्यान लोकल सेवा उपलब्ध नसेल.
या लोकल रद्द
- बुधवारी पहाटे ४.०३, पहाटे ४.१५, पहाटे ४.२५, पहाटे ४.३७, पहाटे ४.५० आणि पहाटे ५.०४ वाजता वाशी येथून सुटणाऱ्या अप दिशेच्या लोकल रद्द करण्यात येणार आहेत.
- गुरुवारी आणि शुक्रवारी पहाटे ४.०३ आणि पहाटे ४.२५ वाजता सुटणाऱ्या वाशी येथून सुटणाऱ्या अप लोकल रद्द करण्यात येणार आहेत.
- बुधवार, गुरुवार, शुक्रवारी रात्री ९.५०, रात्री १०.१४ आणि रात्री १०.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून वाशीसाठी सुटणाऱ्या डाऊन लोकल रद्द करण्यात येणार आहेत.