मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या उपनगरी रेल्वे स्थानकालगतच्या हिमालय पुलाजवळील सरकता जिना सुरू होऊन आठ दिवस झाले. मात्र, हा जिना वारंवार बंद पडत आहे. हा जिना शुक्रवारी सकाळीही बंद पडला होता. मात्र अर्ध्या तासानंतर हा जिना पुन्हा सुरू झाला. त्यामुळे पादचाऱ्यांना त्रास सोसावा लागला. हिमालय पूलाचा काही भाग १४ मार्च २०१९ रोजी कोसळला होता. या दुर्घटनेनंतर तब्बल चार वर्षांनी पालिकेने येथे नवीन पूल बांधला. गेल्यावर्षी हा पूल पादचाऱ्यासाठी खुला करण्यात आला. या पुलाला जोडलेला सरकता जिना गेल्याच आठवड्यात सुरू करण्यात आला. पालिकेने या सरकत्या जिन्यासाठी सुमारे एक कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र हा जिना सुरू केल्यानंतर आठ दिवसांत दोन वेळा बंद पडला. त्यामुळे पादचाऱ्यांना नाहक त्रास होत आहे.

हिमालय पुलावरून रोज हजारो प्रवासी जात – येत असतात. प्रवासी या पुलावरून लोकल पकडण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये जात असतात. तसेच सकाळच्या वेळी लोकलने आलेले असंख्य प्रवासी स्थानकातून बाहेर पडून या पुलावरून पुढे मार्गस्थ होतात. या परिसरात मोठ्या प्रमाणावर सरकारी कार्यालये, महाविद्यालये, रुग्णालये असून येथील कर्मचारी, विद्यार्थी, रुग्णांचे नातेवाईक, पर्यटक या जिन्याचा वापर करतात. त्यामुळे पालिकेच्या पूल विभागाने या पुलाजवळ सरकता जिना बसवला आहे. हा जिना शुक्रवारी सकाळी अचानक बंद पडला होता.

हेही वाचा :उष्णतेमुळे मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; नागरिक उलटी, चक्कर व अतिसाराने हैराण

दरम्यान, याबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या जिन्याच्या कव्हेयर पट्ट्यामध्ये एक दगड अडकला होता. त्यामुळे हा पूल काही वेळासाठी बंद पडला होता. मात्र तपासणी करून काही वेळातच हा जिना सुरू करण्यात आला. पादचाऱ्यांच्या चपलमध्ये अडकून हा दगड या जिन्याच्या यंत्रात गेला असावा. जिन्याच्या जवळच एक सुरक्षा रक्षक नेमण्यात आला आहे. या सुरक्षा रक्षकाच्या माध्यमातून पादचाऱ्यांच्या तक्रारींची दखल घेण्यात येत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा :‘अमित शहा यांनी निश्चित करूनही उमेदवारी का रखडली?’ नाशिकमधून माघारीची छगन भुजबळ यांची घोषणा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिना आठ दिवसांत दोन वेळा बंद पडला

या पुलाला जोडलेला सरकता जिना गेल्याच आठवड्यात सुरू करण्यात आला. पालिकेने या सरकत्या जिन्यासाठी सुमारे एक कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र हा जिना आठ दिवसांत दोन वेळा बंद पडला.