मुंबई : सीवूड्स दारावे आणि नेरूळदरम्यान तांत्रिक बिघाड निर्माण झाला असून हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन लोकल सेवा वाशी ते पनवेलदरम्यान ठप्प झाली आहे. या मार्गावर मेगाब्लॉक असल्याने सकाळपासून रेल्वे सेवा बंद होती. त्यामुळे अनेकांनी सायंकाळी बाहेरची कामे करण्याचे नियोजन केले होते. मात्र, सायंकाळी ४.३० वाजल्यापासून तांत्रिक बिघाड उद्भवल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.

पनवेल ते वाशी अप डाऊन मार्गावर रविवारी ब्लॉक घेण्यात आल्यामुळे अनेकजण ब्लॉक कालावधीपूर्वीच बाहेर पडले होते. सायंकाळी ब्लॉक संपल्यानंतर पुन्हा लोकलने प्रवास करत परतण्याचे अनेकांचे नियोजन होते. मात्र, सायंकाळी ४.३० वाजता सिवुड्स – दारावे – नेरूळदरम्यान तांत्रिक बिघाड उद्भवला. त्यामुळे अनेकांना आर्थिक ताण सहन करत बस, रिक्षा तसेच टॅक्सीने प्रवास करावा लागला. शिवाय, सायंकाळी ब्लॉकनंतरही अनेकांनी बाहेर पडण्याचे नियोजन केले होते. त्यांच्या देखील नियोजन या तांत्रिक बिघाडामुळे कोलमडले. दरम्यान, या तांत्रिक बिघाडामुळे लोकल सेवा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आल्या असल्या तरी लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे युद्धपातळीवर काम सुरू आहे.

या मार्गांवर रेल्वे सेवा सुरूच

१) सीएसएमटी – वाशी – सीएसएमटी

२) बेलापूर – पनवेल – बेलापूर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२) ठाणे – नेरुळ – ठाणे